फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्यावतीने राजेंद्र साळवे ‘समाज भुषण’ पुरस्काराने सन्मानित

0

नगर – पारनेर तालुक्यातील कडुस येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये नगरमधील भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण महासचिव  तसेच सम्यक संकल्प फाऊंडेशनचे सेक्रेटरी  व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे  शाखाधिकारी राजेंद्र वामन साळवे यांना ‘समाज भुषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या सौ.राणीताई लंके, राहुल शिंदे, श्रीगोंदा पं.स. सदस्या सौ.कल्याणीताई लोखंडे, सरपंच मनोज मुंगसे, माजी सरपंच सौ.मंगलताई कौठाळे,  दत्तायत्र जाधव, प्राचार्य दादाराम करजुंले  आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सौ.राणीताई लंके म्हणाले, आज समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहे, अशा घटकांच्या उन्नत्तीतसाठी काम करण्याची गरज आहे. आपल्याला जितके शक्य असेल तितके समाजोपयोग काम करुन समाजातील वंचित घटकांना न्याय दिला गेला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच राष्ट्र पुरुषांचे विचार जनमानसात रुजविण्याचे कार्य करत आहे. या राष्ट्रपुरुषांच्या विचार व मार्गदर्शनावर काम करणार्‍या संस्था, व्यक्तींचा पुरस्कार रुपी सन्मान करुन त्यांचे कार्य अधिक व्यापक करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असाच असल्याचे सांगितले.

     पुरस्कार मिळाल्यानंतर राजेंद्र साळवे म्हणाले, आजच्या पुरस्काराने आम्ही करत असलेल्या कार्याचा गौरव झाला असून, या पुरस्काराने आम्हास यापुढेही अधिक चांगले काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

     या कार्यक्रमाचे नियोजन जयंती समितीचे अध्यक्ष फिरोजभाई शेख, उपध्यक्ष राहुल काळे, सचिव  संजय जाधव, खजिनदार सोमानाथ काळे, कार्याध्यक्ष प्रवीण पाडळे व सहकार्‍यांनी केले होते. यावेळी राजेंद्र करंजुले, संतोष गायकवाड, संजय जाधव, सिंधू साळवे, प्रियंका साळवे, प्रशांत साळवे आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here