बालकांच्या भावनांचा विचार करणे ही काळाची गरज – डॉ.सुचित तांबोळी

0
फोटो - गीता परिवार दक्षिण अहमदनगरच्यावतीने मुला-मुलींसाठी बाल संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा समारोप बालरोग तज्ञ डॉ.सुचित तांबोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी उद्योजक प्रविण बजाज, गीता परिवाराच्या अध्यक्षा सुनंदा सोमाणी, सचिव सोमनाथ नजान, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, अलका नावंदर, ऐश्वर्या वंगा आदि.

नगर – मुलं-मुली नेहमीच चिकित्सक असतात, हे काय? हे कसे? अशा अनेक प्रश्नांनी पालकांना भेडसावून सोडत असतात. एक प्रश्न झाला की दुसरा तयार असतो. त्यांच्या प्रश्नांना योग्य ते उत्तर देऊन त्यांचे समाधान केल्यास त्यांची बौद्धीक क्षमता वाढीस लागते. परिस्थिती व त्यातून सभोवताली निर्माण होणार्‍या भावनांचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या भावनांचा विचार करुन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होईल, याची काळजी घेणे पालक-शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.सुचित तांबोळी यांनी केले.

     गीता परिवार दक्षिण अहमदनगरच्यावतीने मुला-मुलींसाठी बाल संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा समारोप बालरोग तज्ञ डॉ.सुचित तांबोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी उद्योजक प्रविण बजाज, गीता परिवाराच्या अध्यक्षा सुनंदा सोमाणी, सचिव सोमनाथ नजान, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, अलका नावंदर, ऐश्वर्या वंगा आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सौ.सुनंदा सोमाणी म्हणाल्या, गीता परिवाराचे कार्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या प्रेरणेने सुरु झालेले व डॉ.संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाने गीता परिवाराचे कार्य देश विदेशात पसरले आहे. दरवर्षी दिवाळी, उन्हाळ्यात 15 दिवसांच्या बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. यामधून बालकांवर संस्कार होऊन त्यांचे व्यक्तीमत्व खुलण्यास मदत होते, असे सांगितले.

     आनंद विद्यालय, गुलमोहोर रोड व बाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला, नवीपेठ या दोन ठिकाणी झालेल्या शिबीरात मुलांनी उत्साहात सहभाग घेतला. 15 दिवसांच्या या शिबीरात वाणी शुद्धता, श्लोक पठण, योग-प्राणायम, सूर्यनमस्कार, कथा, गाणी, देशप्रेम, व्यायाम, मैदानी खेळ, सामान्यज्ञान, हस्तकला अशा विविध गोष्टी मुले शिकली. त्याचबरोबर राम रक्षा, हनुमान चालिसा, गीतेतील 16 वा अध्याय याचे ज्ञान मुलांनी घेतले. यावर आधारित स्पर्धांही घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.  निबंध स्पर्धा, पाठांतर, रामायणातील पात्र लिहिणे, प्रश्नोत्तर आदिंमधूनही विद्यार्थ्यांची प्रगती दिसून आली. यावेळी शिबीरार्थींनी रामायण नाटिका, नृत्य, योगासने, लेझिम आदिंची प्रात्याक्षिक सादर केले.

     या शिबीर यशस्वतीेसाठी सौ.प्रतिभा बजाज, डॉ.शाम मंत्री, श्रृती गुगळे, श्रद्धा बनसोडे, वैशाली वरुडे, छाया पडवळ, मीनाताई पडवळ, पुनम बिहाणी, कविता मंत्री, दुर्गा जाजू, दिपा शर्मा, अर्चना जोशी, कविता भंडारी, ज्योती कुलकर्णी, सुप्रिया धेंड आदिंनी परिश्रम घेतले.

     यावेळी प्रविण बजाज म्हणाले, शिक्षणातून संस्कार मुलांवर रुजविणे काळाची गरज बनली आहे. मोबाईलपेक्षा मुलांना कृतीयुक्त खेळ दिल्यास त्यांच्यातील कल्पतेला चालना मिळून शारिरीक व मानसिक तंदुरुस्ती निर्माण होत असते. त्यासाठी मुलांना दैनंदिन कामे रंजकतेने शिकविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केले.

     शिबीरासाठी सहकार्य करणार्‍या अएसो.च्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, आनंद विद्यालयाचे सेक्रेटरी श्री.तरटे, मुख्याध्यापक विजय कदम, प्राचार्य प्रभाकर भाबड, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर आदिंचे संयोजकांनी विशेष आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here