नगर – नालेगांव येथील रहिवासी बाळासाहेब (आनंद) जनार्दन बेलेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 41 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.बाळासाहेब बेलेकर यांच्या पश्चात वडिल, पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अकास्मीक निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.