बिंगो-मटका जुगारात पैसे हरल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या ?

तालुक्यात सुरु असणाऱ्या अवैध धंद्याने घेतला आणखी एक बळी ?

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                   श्रीरामपूर येथे बिंगो नावाचा मटका हरल्या नंतर घरातून गेल्या दोन दिवसा पासुन गायब झालेला राहुरी येथिल तरुण विजय सुभाष बोबडे वय 26 वर्षे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहुरीच्या जुना घाट येथिल काटवानात अढळून आला आहे. माञ या तरुणाच्या गळ्यावर रक्ताचे डाग आढळल्याने या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला हे माञ समजु शकले नाही.

                    याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी येथिल विजय सुभाष बोबडे वय 26 वर्षे हा तरुण श्रीरामपूर येथे काही कामानिमित्त गेला असता तेथे बिंगो नावाचा मटका खेळला या मटक्यात मोठी रक्कम हरला असुन त्यानंतर तो घरातून गायब झाला होता. तो दोन दिवसापासुन आढळला नव्हता.मंगळवारी सकाळी मासे पकडताना यातील दोघा जणांना काटवणात मृतदेह बाभळीच्या झाडास लटकलेला दिसला.याबाबतची माहिती राहुरी पोलिसांना दिली असता राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला असता ओढणीच्या कपड्याने गळफास घेतल्याचे दिसत होते. गळ्या भोवती रक्ताचे डाग आढळून आले आहेत.अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात काहीच आढळून आले नाही.

                विजय सुभाष बोबडे  हा वापरत असलेली मोटारसायकल काही अंतरावर लावण्यात आलेली होती.त्याच्या खिशातील मोबाईल व अन्य वस्तू गायब झालेल्या असल्याने  या तरुणाने आत्महत्या केली का ? त्याची हत्या करुन फाशी देण्यात आली.ज्या बाभळीच्या झाडाला फाशी घेतली  त्यास फाशी घेतली तर ते बाभळीचे झाड मोडून जाईल अशी स्थिती असल्याने व फाशी घेतल्या अवस्थेत या तरुणाचे पाय जमिनीवर लोळत होते. त्यामुळे या तरुणाचा घातपात झाला असण्याची शक्यता त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदना नंतर या तरुणाने फाशी घेतली का घातपात झाला हे समजणार आहे. राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यू रजि. नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here