कोपरगांव (वार्ताहर) दि. २५ डिसेंबर २०२२ –
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे जगमान्य नेतृत्व होते त्यांनी उत्तम प्रशासक, माणुसकी मानवतावादाची जपवणुक करून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जगात उंचावली असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील गुरुद्वारारोडवरील संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वी जयंती प्रशासक दिन व मन की बात कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, भारतरल अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्वावर संसदेसह भारतभरातील अनेक सभा गाजविल्या. ते उत्तम कवी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून स्व. वाजपेयी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष असून संशोधन उत्तम प्रशासन आणि तळागाळातील उपेक्षितांना मदत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, व केंद्र तसेच राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. कोरोना’ महामारीत १३० कोटी लोकसंख्येला मोफत कोरोना लस देऊन जगावरील संकट दुर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या महान व्यक्तींच्या कार्याचा लेखाजोखा पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण तळागाळात पोहोचवावी.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन अध्यक्ष पराग संधान, गटनेते रवींद्र पाठक, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, राजेंद्र सोनवणे, गोपीनाथ गायकवाड़, रवींद्र रोहमारे, जितेंद्र रणशुर, सुशांतजी खैरे, दादासाहेब नाईकवाडे, विजय चव्हाणके, जयेश बडवे, किरण सुपेकर, सचिन सावंत, सतिश रानोडे, विष्णुपंत गायकवाड, खालिकभाई कुरेशी, राजेंद्र सुपेकर, श्री आढाव, डाॅ.अनिल जाधव, संदिप देवकर, अशोक लकारे, सोमनाथ म्हस्के, दिनेश कांबळे, सलिम पठाण, मुकुंद उदावंत, रोहनजी दरपेल, पप्पू दिवेकर, जयप्रकाश आव्हाड, रवी शेलार खूप खूप सहानी बाळासाहेब कोळसे सुरेश मरसाळे शंकर बिराडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.