भारताचे संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले : मुख्याध्यापक रमेश गायकवाड

0

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव : भारताचे  संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले आहेत. असे प्रतिपादन विदयालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी मुख्याध्यापक गायकवाड पुढे म्हणाले, संविधानाने आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली असुन त्यामुळे देश एकसंघ वाटचाल करत आहे.  या प्रसंगी कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे यांनी संविधान दिना निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या. 

या  निमित्तानं विद्यालयात संविधान जनजागृती साठी परीपाठातुन इ.८वी अ च्या विद्यार्थ्यांकडून गीत, नाटीका व माहीतीपट सादर करण्यात आला. या प्रसंगी संविधान प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.सौ.कल्पना महानुभाव ताईनी संविधानाचे महत्व विषद केले.या प्रसंगी मे.हवालदार नितीन ठोमसे व मे.हवालदार अनिल कोल्हे,दीलीप तुपसैंदर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी केले.सूत्रसंचलन कुलदीप गोसावी केले तर आभार अनिल अमृतकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सर्व शिक्षक-शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here