भीम सरकार चौकाचे नामकरण व वार्ताफलकाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते अनावरण 

0

कोपरगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील संजयनगर येथील भीम सरकार ग्रुपच्या वतीने भीम सरकार चौकाचे नामकरण व वार्ताफलकाचे अनावरण स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते झाले. 

प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी महामानव, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, संजयनगर येथील हा चौक आजपासून ‘भीम सरकार चौक’ या नावाने ओळखला जाणार आहे. सामाजिक समतेसाठी आणि तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. अशा महापुरुषांचे नाव या चौकाला दिल्यामुळे कोपरगावच्या वैभवात मोठी भर पडली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असामान्य कार्य केले असून, ते केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे भूषण आहेत. त्यांनी सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी खूप मोठे कार्य केले आहे. आधुनिक भारताच्या त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणुसकी जपा, मानवता धर्म जपा, अशी शिकवण दिली आहे. त्यांच्या विचारावरच आज आपला देश प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. 

भीम सरकार ग्रुपचे संस्थापक व माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, वैभव गिरमे, संदीप देवकर, गोपीनाथ गायकवाड, प्रमोद नरोडे, वैभव आढाव, देवरामभाऊ पगारे, शंकर महांकाळे, गौतम रणशूर, राहुल रणशूर, संतोष त्रिभुवन, सुरेश मरसाळे, मुकुल उबाळे, आकाश अंभोरे, मुकेश धुळे, प्रभाकर थोरात, अतुल गुंजाळ, भीमा महांकाळे, राहुल गायकवाड, विशाल बडदे, ऋषी कांबळे, सागर उबाळे, रोहित बडदे, अनिकेत रणशूर, शैलेश सातपुते, सिद्धार्थ गव्हाळे, वैभव रणशूर, रंजन त्रिभुवन, बबलू मरसाळे, दिलीप मरसाळे, आविष्कार रणशूर, अनिल पगारे, आकाश डोखे, कैलास सोनवणे, सागर पवार, गौतम उबाळे आदींसह दलित व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here