कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) भूतलावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे. पैसा – संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगन्या असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेला दान धर्म,गो- सेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन ह भ प रमेश महाराज गांगुर्डे यांनी केले आहे. शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश, श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलश रोहन सोहळा, प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरी कीर्तनात केले आहे.
यावेळी आमदार आशुतोष काळे, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे ,मा.नगराध्यक्ष राजेंद्र झावरे , मा. नगराध्यक्ष विजय वहाडणे, अमृत संजीवनी शुगरकेनचे पराग संधान , मा.नगरसेवक प्रशांत कडू, मा. नगरसेविका दीपा गिरमे, शैलेश साबळे, डॉ. अनिरुद्ध काळे,वैभव गिरमे, डॉ.शेख, पत्रकार शैलेश शिंदे,सोमनाथ सोनपसारे, योगेश डोखे,संतोष जाधव, अनिल दीक्षित,रवींद्र जगताप, दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली.
पुढे बोलताना रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले की, मनुष्याने आपले वय 50 वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे, फिरण्याचे व बाष्कळ बोलण्याला आळा घातला पाहिजे. तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे. नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलो-पावली पुण्य प्राप्त होत असते. आपल्या शरीरातून सर्व दोष नाहीसे होण्यास मदत होते. त्यामुळे नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे. नर्मदेचा अर्थ हास्य देणारी व नराचा हरण करणारी अशी नदी आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मनुष्याच्या डोक्यात कुठल्याही चिंता नसतात. मनुष्याच्या जीवनातील पुण्य नष्ट करण्याकरिता दोनच इंद्रिय जबाबदार आहेत. त्यामध्ये डोळा व वाचा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रत्येक मनुष्याने परमात्म्याचे नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा असेही यावेळी हभप रमेशमहाराज गांगुर्डे म्हणाले आहे.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी आहेर, राहुल देवरे, मुकुंद उगले,सुरेश वाबळे,अनिल गाडे, राजेंद्र गाडे,प्रवीण कदम, शांताराम शेळके, अंकुश चव्हाण, गोकुळ नारळे, सुरेश जाधव, उमेश जाधव, नरेंद्र शिंदे,चंद्रकला आहेर, अश्विनी उगले, संगीता शेळके, सुरेखा गव्हाळे, उषा नारळे ,उषा देवरे,सुनीता शिंदे,रूपाली खोत,अंजली जाधव, शितल कदम, प्रमिला जाधव,रीना गाडे , अर्चना चव्हाण आदीसह साई गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.