मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी माध्यमातील शिक्षण आवश्यक : न्या. भगवंतराव पंडित

0

कोपरगांव : तालुका विधी सेवा समिती कोपरगांव, वकील संघ कोपरगांव आणि श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव यांच्या संयुक्त विदयमाने मराठी संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे  उदघाटन विदयालयात आयोजित केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव येथिल अतिरिक्त न्यायदंडाधिकारी भगवान पंडित होते. या प्रसंगी विदयार्थीना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मातृभाषेतील शिक्षण मुलांना सहज पचनी पडते.संकल्पना स्पष्ट होतात.थोर महापुरुष यांनी  देखिल मराठी भाषेतुनच अभ्यास केला आणि शिकले.संत,महात्मे यांच्या लेखणाची भाषा मराठीच होती.त्यामुळे मराठी भाषेतुन शिकणा-या मुलांनी मनात न्युनगंड न ठेवता शिक्षण घ्यावे व यशस्वी घ्यावे.इंग्रजी भाषेची भिती बाळगु नये.शाळा शाळा मधुन मराठी भाषेला उंची व दर्जा प्राप्त झाला तर मराठी संवर्धन पंधरवडा आयोजित करण्याची गरज  पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला जेष्ठ सरकारी वकील ए.एल.वहाडणे व वकील संघाचे उपाध्यक्ष मनोज कडु उपस्थित होते.

प्रारंभी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.प्रमुख पाहुण्याचे स्वागत पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले.या कार्यक्रमाला विदयालयांतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here