नगर – स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. निवडणुक निरिक्षक म्हणून राज्य ऑलम्पिक संघटनेचे निरिक्षक निलेश जगताप यांनी काम पाहिले तर निवडणुक अधिकारी म्हणून अविनाश कुलकर्णी, सौ.सुहासिनी लांडगे, आश्विनी ठाकरे यांनी सहाय्य केले. यामध्ये अध्यक्ष म्हणून शत्रुघ्न बीरकड (अकोला) यांची निवड झाली.
यामध्ये नगरच्या कुलकर्णीज् स्विम अँड रिसर्च अकॅडमीचे संचालक गणेश कुलकर्णी आणि संचालिका भुपाली कुलकर्णी यांची राज्य सदस्यपदी निवड झाली. ते सध्या वाडिया पार्क आणि सिद्धिबाग स्विमिंग पूल असे दोन्हीही स्विमिंग पूलचे संचालन करीत आहोत. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष- डॉ.जयप्रकाश दुबळे (नागपुर), राजेंद्र निवाळते (नाशिक), डॉ.प्रदीप देशमुख (नाशिक), सेक्रेटरी- डॉ.संभाजी भोसले (नागपूर), जॉईन्ट सेक्रेटरी- श्रीराम पार्वताय (सोलापूर), राजेश्वरी खंगार (बुलढाणा), सुशिल दुरगकर (भंडारा), खजिनदार – महेंद्र कपुर (चंद्रपूर) यांची निवड झाली. राज्य सदस्य म्हणून समशेर पठाण (गडचिरोली) विजय पळसकर (बुलढाणा), श्रीमती भुपाली कुलकर्णी (नगर), अभय क्षीरसागर (बीड), रमेश गंगावणे (हिंगोली), सुभाष देठे (जालना), डॉ.आनंद मकवाना (गोंदिया), सुंदर लोमटे (उस्मानाबाद), आदित्य वानखेडे (वाशिम), गणेश कुलकर्णी (नगर) यांचीही निवड करण्यात आली. तत्पूर्वी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.जयप्रकाश दुबळे हे होते. यावेळी डॉ.देशमुख, बीडकर, निम्बारले, जुलीन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ.संभाजी भोसले यांनी केले तर आभार सुशिल दुरणकर यांनी मानले.