संगमनेर : चारित्र्यावर संशय घेतल्याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने आपल्या वकील पत्नीला मारहाण करत तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी महिला वकिलाच्या फिर्यादीवरून महिला वकिलाचा पती व सासू- सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत,त्यांना समजावून सांगा असे घुलेवाडी येथे राहणाऱ्या एका महिला वकिलाने आपल्या सासुला सांगितले. याचा राग महिला वकिलाच्या पतीला आल्याने तिच्या पतीने तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी सदर महिलेच्या सासू-सासरे यांनी या महिलेला बेडरूम मध्ये नेवुन तिथे तिच्या पतीने तीचा गळा दाबुन, जिवे ठार मारायचा प्रयत्न केला. यावेळी सासू आणि सासरे पतीला म्हणत होते की, तिला आज गळा दाबून जिवंत मारून टाक. मारहाण करताना त्यांनी घराचे दरवाजे बंद केले होते. सासु सासरे हे दोघेपण मारहाण करत होते.मारहाणीत सदर महिला वकिलाच्या गळ्याला पोटाला छातीला मार लागला असून सदर महिला वकिल खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.याबाबत सदर महिला वकिलाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष विठ्ठल जाधव, विठ्ठल पांडुरंग जाधव, मंदा विठ्ठल जाधव सर्व रा घुलेवाडी ता संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.