नगर – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणारा ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ नगरच्या मार्लिन एलिशा, मधुर बागायत व इव्हेंजेलिन मनशा यांना दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, आयोगाचे सचिव रंजीत सिंह यांचे हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिघांना सन्मानित करण्यात आले.
मर्लिन एलिशा या एल्विन कारमेल कलर्स कंपनीच्या महाव्यवस्थापक असून रोटरी क्लब मिडटाऊनच्या माध्यमातून विविध सामाजिक सेवांच्या उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभगी असतो. मधुर बागायत आणि इव्हँजेलिन मनशा हे प्रशिक्षक आणि समुपदेशक आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मार्लिन एलिशा, मधुर बागायत व इव्हेंजेलिन मनशा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिल्ली येथे झलेल्या कार्यक्रमात देशातील सोळा राज्यातील सामाज सेवकांना राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक अनूप चावला व डॉ.भरत झा, जीएसटीचे सहाय्यक आयुक्त सरांश महाजन, दिल्लीचे सेवानिवृत्त अग्निशमन दलप्रमुख डॉ.धर्मपाल भारद्वाज, शास्त्रीय गायक पंडित बलदेव राज वर्मा यावेळी आदी उपस्थित होते.