मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातला आजवरचा मोठा सल एका मुलाखतीत बोलून दाखवला आहे. 2004 साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्रिपद घेतलं असतं, तर सत्तेत आम्हीच राहिलो असतो, असंही अजित पवार लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69, शिवसेनेला 62 आणि भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, याबदल्यात राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती मिळाली.
- Advertisement -
Latest article
स्ट्रॉंग रुममध्ये भाजप कार्यकर्त्यांची घुसखोरी? रोहित पवारांच्या आरोपाने एकच खळबळ
कर्जत : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झाल्याची...
1994 च्या हिवाळी अधिवेशनाचा रक्तरंजित इतिहास
गोवारी समाजाला आदिवासी दर्जा मिळावा व त्यांना जातप्रमाणपत्रे मिळावीत या मागणीसाठी गोवारी बांधवांनी 23 नोव्हेंबर 1994 रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात...
“५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन”; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
मुंबई : महाराष्ट्रात उद्या मतमोजणी होणार आहे. कोणाचे सरकार येईल, मुख्यमंत्री कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...