नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील माळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व मुळा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री बाळासाहेब दादाबा पाटील यांना सोनई येथील स्नेह फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा प्रगतशील शेतकरी पुरस्कार नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते व हभप उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला.
देवगडचे सेवेकरी असलेल्या बाळासाहेब पाटील यांनी परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करून जनजागृती केली आहे तसेच स्वतःची शेती देखील चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन करत असल्याने स्नेह फाऊंडेशनने त्यांच्या कार्याची दखल घेत प्रगतशील शेतकरी हा
पुरस्कार प्रदान केला आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब पाटील यांचे जेष्ठ नेते व साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख,सौ.सुनिताताई गडाख,प्रेस क्लबचे संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे, प्रवरासंगमचे माजी सरपंच
सुनीलराव बाकलीवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.