मोबाईल घेण्यास न दिल्याच्या कारणातून तरूणाची आत्महत्या …

0

 जामखेड तालुका प्रतिनिधी ;

महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडीलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. गजानन रामदास उगले, वय २३ रा. नायगाव असे मयत मुलाचे नाव आहे. उपचारादरम्यान गजानन याचा तब्बल २३ दिवसांनी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की मयत गजानन रामदास उगले याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक आहेत. गजानन याने वडीलांकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले मात्र ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले याने मागिल महीन्यात दि २८ एप्रिल २०२४ म्हणजे २३ दिवसांपुर्वी विषारी औषध प्राशन केले होते. या नंतर त्याच्यावर २३ दिवसां पासुन जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

गजानन याच्या तब्यतीमध्ये हळु हळु सुधारणा होत होती. तसेच त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात देखील येणार होते. मात्र काल दि १८ रोजी सायंकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने सदरची नोंद खर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सध्या तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे शुल्लक कारणावरून अनेक तरुण आत्महत्तेचे पाऊल उचलताना दिसत आहेत. कोरोना नंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. मोबाईल व सोशल मिडीया मुळे देखील मुलांचा चिडचिड पणा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी शारीरिक व मानसिक आरोग्य जपावं व पालकांनी देखील मुलांवर योग्य लक्ष द्यावे असे तज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here