जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील रत्नापुर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच सांगवी व मुसलमान वाडी येथील उमेदवार यांचा सत्कार पाटोदाचे माजी सरपंच समीर पठाण यांनी पाटोदा ग्रामपंचायत येथे केले. रत्नापूरचे सरपंच लक्ष्मण जाधव उपसरपंच चंद्रकांत वारे तसेच ग्राम. सदस्य रत्नापूर चे दिलीप वारे, शैलेश कदम, चेअरमन बबन ढवळे, मधुकर वराडे, ह भ प बिबीशन ढवळे, तसेच पाटोदा सरपंच अशोक गव्हाणे यांचा सत्कार माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते समीर पठाण यांनी केले. याप्रसंगी अनिल थोरात, दिलीप मोरे, इस्माईल पठाण, खालिद पठाण, दत्ता भाकरे, मच्छिंद्र लंगे, केदार वाबळे, सर्जेराव आमटे, बापू साहिल, पठाण बाबू, महानवर चरण, कदम सुनील, शेख गफार, देविदास साळवे, चरण कदम, बापू महारनवर, गोकुळ महारनवर, आरिफ सय्यद, महादेव महारनवर, बाबू महानवर, भाऊसाहेब शिंदे, पंडित मोरे, सोमनाथ सोनवणे, व पाटोदा ग्रामस्थ तसेच रत्नापूर ग्रामस्थ उपस्थित होते अनिल थोरात यांनी सर्वांचे आभार मानले माजी सरपंच पठाण यांनी जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने शैलेश कदम चेअरमन बबनराव ढवळे रत्नापूर सरपंच लक्ष्मण जाधव उपसरपंच बंडू वारे यांनी समीर पठाण यांचे अभिनंदन केले सरपंच उपसरपंच यांच्या निवडीबद्दल सदस्य निवडीबद्दल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यावर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष दत्त वारे यांच्यावर जो जनतेने विश्वास दाखवून आपल्याला निवडून दिले आहे त्यांचे ऋण म्हणून आपण सर्वांनी पाच वर्षे सर्व जनतेची सेवा करावी अशी मागणी माजी सरपंच समीर पठाण यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल थोरात यांनी केले व पाटोदा सरपंच यांनी आभार मानले