रसरंग हॉटेल जवळील मुतारी पडली की पाडली ? बांधकाम व्यवसायिकावर कारवाई होणार काय ?

0

कोपरगाव : कोपरगाव शहरातील मध्यवर्ती लोक वस्तीत असलेल्या गुरुद्वारा रोड येथील गेल्या अनेक वर्षापासून रसरंग कॉर्नर शेजारील पुरुषांसाठी असलेल्या मुतारीचे गेल्या आठवड्यात च नुकतेच रिनिव्हेशन करून हजारो रुपये यासाठी कोपरगाव नगरपालिकेने खर्च केले होते, मात्र या ठिकाणी नव्याने होत असलेल्या व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे ,सदर नव्या इमारतीच्या पाया घेण्या करिता खड्डा घेणे सुरू आहे,,,त्यात सदर मुतारी अचानक पडली,,,मात्र सदर मुतारी पाडली का पडली ह्याची शहानिशा पालिकेने करून सदर बाबतीत गुन्हा दाखल करणार का,, असा प्रश्न परिसरातील नागरिक, व्यापारी, दुकानदार यांच्याकडून उपस्थित होत आहे.
सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इतर पुरुषांसाठी मुतारीची व्यवस्था नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, त्यामुळे या ठिकाणी त्वरित मुतारीची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधुन व व्यापाऱ्यांमधून होत आहे.
कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर फक्त २ मुताऱ्या आहे ,,अजून मुताऱ्या उभ्या केल्या पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती,,त्यात ही सदर एक पडल्या ने अजून समस्या निर्माण झाली आहे,,,पालिका प्रशासनाने पुरुष व महिलांसाठी स्वछता गृह उभारण्याची अत्यंत गरज असून हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here