राज्यघटना ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील मुल्यांचे, स्वप्नांचे आणि आदर्शाचे प्रतिक – रिबेका क्षेत्रे

0

अहमदनगर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हा देश कोणत्याही धर्मावर आधारित असू नये असे वाटत होते. प्रजासत्ताक देशात नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना महत्व दिले आहे. लोकांनी, लोकांकरिता चालविलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक दिन अर्थात लोकशाही आहे. सध्या ती आपण टिकवली पाहिजे. राज्य घटनेचा आदर केला पाहिजे, कारण राज्य घटना ही आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील मुल्यांचे, स्वप्नांचे आणि आदर्शाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांनी केले.

     निर्मलनगर येथील डोके विद्यालयात विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ज्योती पवार व मीना माने यांनी भारत देशाच्या नकाशात तिरंगा ध्वज, रांगोळीमधून साकारला होता. देखाव्याचे सर्वांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

     प्रारंभी डोके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सलामी दिली. यावेळी जि.प.च्या माजी सदस्या माई पानसंबंळ, बीड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा मिनाक्षीताई पांडूळे, दैमिवाल सर, मुख्याध्यापक संभाजी पवार, आशा धामणे, सुजाता कर्डिले, मंजु नवगिरे, मंदाकिनी पांडूळे, संजोग बर्वे, श्री.जगदाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

     विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून तिरंगा झेंडा हाती घेऊन वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन टाकला. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी राऊत यांनी केले तर आभार संभाजी पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here