राज्यस्तरीय पॉवरथॉन स्पर्धेत नमन खंडेलवाल दुसरा

0

नगर -इंडियन ट्रायथॉलिन फेडरेशनच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पॉवरथॉन या स्पर्धेत नमन रितेश खंडेलवाल याने  दुसरा क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धा ही तीन प्रकारात होती. यामध्ये स्विमिंग (750 मी.), सायकलिंग (20 कि.मी.), रनिंग (5 कि.मी.) अशा एकत्रित स्पर्धेत नमन याने फक्त 1 तास 25 मिनिटांत पूर्ण केली. त्यांस मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.

     नमन खंडेलवाल याने या अगोदरही 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन चार वेळा 10 कि.मी. मॅरेथॉन पाच वेळा तसेच अहमदनगरचा भुईकोट किल्ला ते गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी हे 550 कि.मी.चे अंतर तीन दिवसात पुर्ण केले होते. 100 कि.मी. सायकलीची बीआरएम स्पर्धामध्येही दोन पूर्ण केली.

     नमन यास वडिल रितेश जगदिश खंडेलवाल, एस.पी.जे. स्पोर्टस् क्लबचे संदिप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.  नगरमधील जे.के. सिरॅमिक संस्थेचे संचालक रितेश खंडेलवाल यांचा मुलगा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here