खा.डाँ.सुजय विखे आणि माजी मंञी शिवाजीराव कर्डीले यांना शेतकरी मतदारांनी नाकारले देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणामध्ये दुरंगी लढत होत असताना महाविकास आघाडी पुरस्कृत जनसेवा मंडळ विरोधात भाजपा पुरस्कृत विखे – कर्डिले अशी सरळ लढत होत असताना राहुरीच्या राजकारणाचा खा.डाँ.सुजय विखे व माजी मंञी शिवाजीराव कर्डीले यांना बाजार समितीच्या सभासदांनी नाकारुन सत्तेच्या चाव्या लोणी किंवा नगरच्या हातात न देता माजी मंञी प्राजक्त तनपुरे व विद्यमान सभापती अरुण तनपुरे विश्वाहर्ता दाखवुन पुन्हा सत्ता ताब्यात दिली.महाविकास आघाडी तथा जनसेवा मंडळ यांना 16 जागा तर भाजपा प्रणित विकास मंडळाला अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
राहुरी कृषी बाजार समितीसाठी दुपारी 4 वाजे पर्यंत 98.71 टक्के मतदान झाले होते.2 हजार 800 मतदारांपैकी 2 हजार 764 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. तनपुरे विरुद्ध विखे कर्डीले अशी सरळ लढत झालेली असताना मतदारांनी विखे कर्डीलेचे राजकारण राहुरी नाकारुन सत्तेची चावी तनपुरे यांच्या हाथी दिली आहे. या निवडणुकीत डाँ.तनपुरेचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, अमोल भनगडे, सुरेश बानकर या दिगग्ज उमेदवारांचा पराभव झाला आहे. जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा मोठा जल्लोष केला आहे.
राहुरी बाजार समितीची मतमोजणीला सुरवात झाल्या नंतर पञिकांची जुळवाजुळव पहाताच भाजपा तथा विकास मंडळाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातुन काढता पाय घेतला.मतमोजणी निकाल पुढील प्रमाणे
विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण 7 जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ), दत्तात्रय यादव कवाने 684 (विजयी),बाळासाहेब रखमाजी खुळे 724 (विजयी),रखमाजी बन्सी जाधव 696 (विजयी), अरुण बाबुराव तनपुरे 814 (विजयी), महेश केरू पानसरे 714 (विजयी), विश्वास धोंडिराम पवार 661(पराभूत),नारायण धोंडिराम सोनवणे 663(पराभूत),भाजपा प्रणित विकास मंडळाचे संदिप लक्ष्मण आढाव 596 (पराभूत), सत्यजित चंद्रशेखर कदम 665(विजयी),किरण वसंत कोळसे 538 (पराभूत),महेंद्र नारायण तांबे 598(पराभूत), शामराव शंकरराव निमसे 670 (विजयी),भगीरथ दगडू पवार 531(पराभूत),उदयसिंह सुभाष पाटिल – 590 (पराभूत)
विविध सोसायटी महिला राखीव २ जागेवर महाविकास आघाडीचे (जनसेवा मंडळ) शोभा सुभाष डुकरे 709 (विजयी), सुनीता रावसाहेब खेवरे 808 (विजयी),भाजपा (विकास मंडळ) उज्वला राजेंद्र साबळे 600 (पराभूत), उषा ज्ञानदेव मांगुडे 576 (पराभूत),
विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग १ जागेवर महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ) दत्तात्रय निवृत्ती शेळके 697 (विजयी), भाजपा (विकास मंडळ) दत्तात्रय नारायण खुळे 589 (पराभुत)
विविध सेवा सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) रामदास परसराम बाचकर – 763 (विजयी) भाजपा (विकास मंडळ) आशिष विठ्ठल बिडगर 509 (पराभुत)
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ २ जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) मंगेश जालिंदर गाडे 478 (विजयी), शारदा किसन आढाव 458 (विजयी),भाजपा (विकास मंडळ) अमोल साहेबराव भनगडे 311(पराभुत), विराज तान्हाजी धसाळ पराभूत 337 (पराभुत)
ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती १ जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) मधुकर प्रभाकर पवार 466 ( विजयी),भाजपा ( विकास मंडळ) नंदकुमार लक्ष्मण डोळस 338 (पराभुत)
ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक १ जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) गोरक्षनाथ तुकाराम पवार 443(विजयी), भाजप (विकास मंडळ) सुरेश पंढरीनाथ बानकर 365 (पराभुत)
व्यापारी आडत मतदार संघ २ जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ 308 (विजयी),सुरेशलाल बन्सीलाल बाफना 312 (विजयी) भाजपा (विकास मंडळ) राजेंद्र सखाहरी वालझाडे 19 (पराभुत), दिपक अरविंद मेहेत्रे 15 (पराभुत)
हमाल मापाडी मतदार संघ 1 जागेवर महाविकास आघाडी (जनसेवा मंडळ) मारुती रंगनाथ हारदे 171(विजयी), भाजपा (विकास मंडळ) शहाजी दादा तमनर 61(पराभुत)
महाविकास आघाडी तथा जनसेवा मंडळाचे सोसायटीच्या सर्वसाधारण गटातील विश्वास धोंडिराम पवार 661, नारायण धोंडिराम सोनवणे 663,मते मिळुन पराभुत झाले विजयी उमेदवार सत्यजित कदम यांना अवघी दोन मते तर शामरावा निमसे यांना 5 मते जादा पडल्यामुळे जनसेवा मंडळाच्या नेत्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मतमोजणीचे शुल्क भरल्या नंतर राञी उशिरा पर्यंत फेरमतमोजणी सुरु होती.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राहुरीचे साहय्यक निबंधक संदिप रुद्राक्ष हे होते.