कुलगुरु डाॅ.प्रशांतकुमार पाटील यांच्या नावाने भेट
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठातील केशर आंबा राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. विद्यापीठातील केशर आंबा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत असते. विद्यापीठातील केशर आंब्याच्या पेट्या कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील यांच्या वतीने भेट रुपाने विद्यापीठातील अधिकाऱ्यांसह त्यांचे भाऊबंद व पाहूण्यांसाठी दिला असून केशर आंबा पाहुण्यांसाठी गोड झाला आहे. केशर आंब्या बाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
सध्या आंब्याचे सिजन सुरु आहे. अनेकजण मोठ्या आवडीने आंबे खातात राहुरी येथील कृषी विद्यापीठातील केशर आंबा हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. विद्यापीठातील केशर आंबा घेण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत असते. केशर आंब्याचा दरवर्षी तुटवडा जाणवतो.या वर्षी तर सुरवातीलाच तुटवडा निर्माण झाला आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील यांनी साधारण दहा किलोची केशर आंब्याची पेटी भेट रुपाने दिल्याने केशरची गोडी वाढली आहे.अधिकारी कर्मचारी व त्यांच्या पाहुण्यांना वानुळा वाटल्याने विद्यापीठातील केशर आंब्याचा तुटवडा जाणवत असल्याची खवय्या मध्ये होत आहे.
प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या हाथी आलेल्या माहितीनुसार राहुरी कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाथाशी धरुन ” कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून केशर आंबा भेट.” असा मजकूर छापून त्यावर विद्यापीठाचा शिक्का मारलेला असून लेबल लावलेल्या विद्यापीठातील केशर आंब्याच्या पेट्या भरुन आपले भाऊबंद व पाहूण्यांना पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.भाऊबंद व पाहुण्यासाठी केशरची गोडी वाढली आहे.
विद्यापिठात आंब्याची पॅकिंग व लेबल चिटकविण्याचे एका विभागाला सोपविण्यात आले आहे.पाहुणे भाऊबंदांना केशर आंबा भेट देण्यासाठी मिळावा विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचारी पॅकिंग केलेल्या आंब्याच्या पेट्यावर कुलगुरुंच्या नावाचे लेबल लावण्याचे काम करीत आहेत.
राहुरी कृषी विद्यापीठातील केशर आंब्याचा लिलाव करण्यात आलेला आहे.लिलाव धारका कडून हा आंबा विकत घेतला का? अधिकाराचा वापर करुन विद्यापीठातील केशर आंब्याची लूट केली का? अधिकारी व कर्मचारी विद्यापीठातील केशर आंब्याच्या पेट्या कोणा कोणाला पाठवतात. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
राहुरी येथील कृषी विद्यापीठ हे आपल्या कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत आले आहे. सध्या सुरु असलेल्या केशर आंब्याचा वानोळा वाटण्याच्या कामामुळे पून्हा एकदा विद्यापीठ प्रशासन चर्चेचा विषय बनले आहे.चौकट
पेटी रत्नागिरी हापूसची, पेटीत माञ केशर आंबा
कृषी विद्यापिठाच्या कुलगुरु डाॅ.प्रशांतकुमार पाटील यांच्या केशर आंबा भेट देताना पँकींगसाठी रत्नागिरी हापूस आंब्याची छपाई केलेले बाँक्स वापरण्यात आले.रत्नागिरी हापूसच्या पेटीत माञ केशर आंबा कुलगुरु डाॅ.प्रशांतकुमार पाटील याच्या नावाने भेट देताना उल्लेख करण्यात आला आहे.