राहुरी तालुक्यातील भाविक केदारनाथ मध्ये अडकले

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

               राहुरी तालुक्यातील भाविक  केदारनाथ याञेला जात असताना दरड कोसळल्याने  राहुरी, टाकळीमिया,खुडरगाव येथिल आठ भाविक अडकले असुन गौरी कुंडा पासुन पाच कि.मी.हे भाविक अडकुन पडले आहेत.

         

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आठ भाविक 10 सष्टेबर रोजी केदारनाथ याञेला रवाना झाले.राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, संदिप शिरसाठ,राहुल करपे तर खुडसरगाव येथिल प्रमोद पवार सतिश पवार,राहुरी येथिल सचिन म्हसे किशोर वराळे सागर मोरे आदी भाविक  केदारनाथ याञेला पोहचण्यापुर्वीच या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असल्याने हे भाविक रस्त्यात अडकले आहेत.पाच कि.मी अंतरावर गौरीकुंड असुन त्यापुर्वीच रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक पुर्ण बंद झाली आहे.

गुरवारी सकाळी केदारनाथ मार्गावर असताना घनसाली यागावात दरड कोसळली.दहा ते बारा तासा नंतर रस्ता मोकळा करण्यात आला. गौरीकुंडा कडे मार्गस्थ असताना गौरी कुंड अवघ्या पाच कि.मी. राहिले असताना पुन्हा दुसरी दरड कोसळल्याने केदारनाथकडे जाणारा मार्ग पुर्णपणे बंद झाला आहे. रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असुन केदारनाथ मार्गावरील डोगंराच्या दरडी कोसळत असल्याने केदारनाथचा मार्ग बंद झालेला आहे.केदारनाथ दर्शन बंद असल्याचे  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here