आग विझवण्यासाठी दोन रन रागिणींनी जिव धोक्यात घालुन आग विझवली.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी:
राहुरी फॅक्टरी येथीलवन विभागाच्या वन चेतना केंद्रत साधारण दुपारी एकच्या सुमारास जुनी रोपवाटिकेच्या ९ एक्कर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीने उग्ररूप धारण केले होते.अग्निशमन दल येई पर्यंत सुशिला उर्फ माया आल्हाट व त्याची सुन गिता आल्हाट या दोघींनी जिव धोक्यात घालुन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,राहुरी फँक्टरी येथिल पत्रकार जालिंदर आल्हाट हे वन विभागाजवळील शाळेत कामा निमित्त जात असताना आग लागल्याचे दिसले.त्यांनी तातडीने अग्निशमन विभागास संपर्क करुन पाचारण केले.देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अग्निशामक बंब व कर्मचारी आग विझविण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती.
वन विभागाच्या वन चेतना केंद्राजवळ राहत असलेल्या सुशिला उर्फ माया आल्हाट व त्याची सुन गिता आल्हाट यांनी शेजारील शाळेला आगीची झळ बसू नये म्हणून आग विझवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला झाडाच्या ओल्या पाल्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.आग विझवताना या दोघींनी जिवाची पर्वा केली नाही. या दोघींनी शाळेच्या बाजुकडील आग विझवली नसती तर शाळेला आगीची झळ बसली असती त्या विद्यार्थ्यांना झळ बसली असती.या दोघी मुळे शाळेला आगीची झळ बसली नाही.
अग्निशामक बंबाच्या साहय्याने पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणण्यात आली.अग्निशमन विभागाचे प्रमुख गोपाल भोर,सुनील खाटीक,सखाहारी सरोदे आदींनी अग आटोक्यात आणली. वनरक्षक प्रदीप कोहकडे यांना संपर्क करुन वन चेतना केंद्रात आग लागल्याची माहिती दिली.वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.ताहाराबाद येथिल आरोग्य सेवक सोमनाथ आहेर हे कामावरुन घरी जात असताना आग विझवण्यास मदत केली. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षकांनी आग विझवण्यात मदत केली.