राहुरीच्या पोलिस उपनिरीक्षकाच्या दालनात साप सोडून घात करण्याचा प्रयत्न?

0

साप सोडणारी अज्ञात व्यक्ती व घरभेदी कोण ?

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

राहुरी पोलिस ठाण्याचा कारभार सध्या त्या चार चौकडी मार्फत चालविला जात असल्याने चौकडी सांगेल त्याच्यावर छापा मारणे, कारवाई, गुन्हा दाखल करणे असे प्रकार होत असल्याने एका अज्ञात व्यक्तीने चक्क विषारी नाग जातीचा साप पोलिस उपनिरीक्षक यांच्या दालनातील टेबलच्या ड्राव्हर मध्ये सोडल्याने अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखून तत्काळ एका सर्प मित्राला पाचरण करण्यात आले दालनातील ड्राव्हर मधील सापाला बाहेर काढण्यात आल्याने पोलिसांनी सुटकेचा सुस्कारा टाकला.

                 सविस्तर माहिती अशी की, पोलिस म्हटले की गुन्हेगारांसह अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र चक्क पोलिस अधिकारी ज्या दालनात काम करत होते. त्या ठिकाणी असलेल्या दालनातील टेबलच्या ड्राव्हरमधे चक्क साप निघाल्याने दालनात असलेले पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा  व पोलीस कर्मचाऱ्यांनी दालनाच्या बाहेर पळ काढला. एका पोलिस कर्मचाऱ्याने एका सर्प मित्रास पाचारण केले त्या सर्प मित्राने मिशावर ताव देत त्या सापाला पकडून जंगलात सोडून दिले.

              राहुरी पोलिस ठाण्यात पोलिसांमध्ये अंतर्गत अधिकाऱ्यांकडे कानभरणीचे प्रमाण वाढले आहे.त्या चौकडीने अधिकाऱ्याकडे अनेक पोलिसांबद्दल कानभरणी केल्याने त्याचा ञास पोलिसांना होत असल्याने अनेक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. कानभरणीचे काम चौकडी करीत असतानाही नाव माञ दुसऱ्याचे पुढे येत असल्याने पोलिस संभ्रमण अवस्थेत आहे.याच चौकडी मार्फत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येते.तालुक्यात कोणताही गुन्हा दाखल झाला की तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नान्हेडा यांच्याकडे जातो.नाऱ्हेडा यांचा स्वभावगुण व तापटपणा अंगात असल्याने तालुक्यात अनेकांशी वाद निर्माण झाले आहे. गंभीर स्वरूपाचे तपास करत असताना त्यांनी कोणालाही दयामया दाखवली नाही. जिल्ह्यात गाजलेले देवळाली प्रवरा येथिल पोलिसांनी पकडलेला राशेनचा तांदूळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला दबाव? तसेच हिंदुत्ववादी संघटनेचा पदाधिकारी चेन्या बेग व सज्जन नान्हेडा यांचे राहुरी न्यायालय परिसरात झालेली झटापट. यासह चिंचोली येथिल कुख्यात वाळू तस्कर दिपक लाटे सरकारी कामात अडथळा निर्माण केलेला गुन्हा दाखल करणे.या गुन्ह्याच्या कारणातूनच अज्ञात व्यक्तीने उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांच्या दालनातील टेबलच्या ड्राव्हर मध्ये अज्ञात व्यक्तीने विषारी जातीचा नाग सोडण्यात आला.

                 तालुक्यातील अनेक प्रकरणे व यासह अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा  हे करत आहेत. गुन्ह्यांचा तपास ठप्प होण्यासाठी तर पोलीस उपनिरीक्षकाच्या दालनात साप सोडून त्या पोलिस अधिकाऱ्याचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न तर कोणत्यातरी गुन्हेगार किंवा घरभेदी तर करत नाही ना? या बाबत वेगवेगळ्या चर्चला उधाण आले आहे.

चौकट

           पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा  यांनी त्यांच्या एका पोलिसासह खबऱ्या मार्फत  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पकडलेला राशेनचा तांदूळ प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी आलेला वरीष्ठ पातळीवरील दबाव ? तसेच राहुरीच्या न्यायालयात हिंदुत्ववादी संघटनेचा पदाधिकारी सागर (चन्या) बेग याच्याशी सज्जन नाऱ्हेडाशी झालेली झटापट ? अन् गुन्हा दाखल करु नये यासाठी थेट नागपुर वरुन फोन आला होता.? त्यामुळे चन्या बेगवर गुन्हा दाखल करण्याचे टाळले गेले होते. तसेच चिंचोली येथिल कुख्यात वाळू तस्कर दिपक लाटे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अग्रेसर नाऱ्हेडा  हेच होते. असे अनेक दाखल केलेले गुन्हे? यासह अनेक गंभिर स्वरुपाचे तपासाचा छडा पो. उपनिरीक्षक नान्हेडा हे करत असतांना अचानक त्यांच्या दालनात साप निघाल्याने वेगवेगळ्या चर्चला उधाण आले असून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here