राहुरीच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस पलटी.

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

             राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेवून जाणारी बस अवघ्या १५ कि.मी. अंतरावर नगर मनमाड महामार्गावरील  चिंचोली फाटा येथे मंगळवारी दुपारी ३ वा पलटी झाल्याने बस मधील ४५ विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले.बस पलटी झाल्याने बस मधील सर्व विद्यार्थी घाबरुन गेले होते.सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.या अपघाताची माहिती पालकांना समजातच पालकांनी अपघातस्थळी धाव घेतली.महिला पालकांचा आपल्या पाल्यास शोधण्यासाठी मोठा अक्रोश करीत होत्या.

           

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशाळेतील इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थी व विद्यार्थींनीची सहल गुजरात राज्यातील स्ट्याचु आँफ युनिटी येथे सहल जाण्यासाठी खाजगी बस (क्र. एम एच ११बी एल ९७४७)  करण्यात आली होती.दुपारी २ वा राहुरी शहरातुन सहलीसाठी बस रवाना झाल्या. राहुरी शहरा पासुन अवघ्या १५ कि.मी.अंतरावर बस आली असताना पाठीमागुन येणाऱ्या टेंपोने बसला कट मारला .बस चालकाने डाव्या बाजुला बस घेतली असता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी साईटपट्ट्या खोदलेल्या असल्याने पुढील चाक खोदलेल्या खड्ड्यात गेल्याने बस अचानक पलटी झाली.

                 बस अचानक पलटी झाल्याने विद्यार्थी व शिक्षक घाबरुन गेले. विद्यार्थ्यांचा एकच आरडा ओरडा सुरु झाला. चिंचोली फाटा येथिल सरपंच गणेश हारदे,रणजित आरगडे,दौलत वर्पे,अशोक टकले,दत्तू वर्पे व इतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव केली.विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या अपघातात विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने जीवितहाणी टळली आहे.

                 

 या अपघाताची माहिती राहुरीत समजताच पालकांनी अपघातस्थळी धाव घेतली. आपल्या पाल्याचा शोध घेवुन आपला पाल्य सुखरुप असल्याचे दिसताच पालकांचा जीव भांड्यात पडला. सर्व विद्यार्थ्यांना खाजगी बसद्वारे पुन्हा राहुरी नेण्यात आले. विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करुन सहलीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे.

        अपघात घटल्यानंतर दोन तासा नंतरही राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अपघातस्थळी आला नाही.श्रीरामपूर येथिल प्रादेशिक परिवहन अधिकारी घटनास्थळी थांबुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.हा अपघात नगर मनमाड महामार्गावरील खोदकामामुळे झाला असल्याने पालकांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळ आला होता पण वेळ आली नव्हती.नगर मनमाडचा ठेकेदार आणखी किती जणाचा बळी घेणार आहे.असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here