राहुरीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 राहुरी शहरातून आज दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळच्या दरम्यान भर बाजार पेठेतून एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही तरुणांनी पर प्रांतीय आरोपी तरुणाला जागेवरच रंगेहाथ पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

           या घटनेतील ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी तीसरी इयत्तेत शिकत असून ती राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. आज दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान ती मुलगी तीचे वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती. ती पून्हा घरी जात असताना ती शहरातील भागीरथीबाई शाळा परिसरात रस्त्याने जात असताना एक पर प्रांतीय तरुण तीला म्हणाला कि, माझ्या बरोबर चल मी तूला तूझ्या आईकडे सोडतो. तेव्हा त्या मुलीने नकार दिला असता त्या पर प्रांतीय तरुणाने त्या मुलीचा हाथ धरुन तीला जबरदस्तीने घेऊन जात होता.

त्यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला. तेथे असलेल्या एका चहा दुकाना समोर शहरातील काही तरुण चहा पीत असताना सदर प्रकार त्यांनी पाहीला. त्यांनी सदर मुलीची चौकशी केली असता तीने घडलेला प्रकार तरुणांना सांगीतला. त्यावेळी तरुणांनी मुलीचे अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारले असता त्याने मुका असल्याचे भासवून उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी त्या पर प्रांतीय तरुणाची यथेच्छ धुलाई केली. तेव्हा तो बोलू लागला. दरम्यान त्याने चार ते पाच वेळा मोठ्याने शिट्टी मारली. जणूकाही त्याने आपल्या साथीदारांना इशारा दिला. अशी माहिती मिळाली. त्यानंतर तरुणांनी त्याला पकडून राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज मिळवीण्याचा प्रयत्न केला. 

       

सदर कोणत्या राज्यातील आहे, त्याच्या बरोबर आणखी कोण कोण आहे. या तपास पोलिस करत होते. आज गणेशोत्सव सुरु होत असताना बाजार पेठेत प्रचंड गर्दी होती. एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे तालूक्यातील पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटने बाबत दुपारी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here