देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी पोलिस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या असून राहुरी खुर्द येथे दिनांक २२ डिसेंबर च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एक दुकान फोडून हव्या भरण्याचे मशीन चोरून नेल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे राहुरी खुर्द परिसरात पून्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजय शंकर लोखंडे, वय ५१ वर्षे, रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी. हे राहुरी खुर्द गावात नगर मनमाड रोडलगत साई श्रध्दा वॉशिंग सेंटर या नावाने वॉशिंग सेंटरचे दुकान चालवतात. त्यांनी गाडीत हवा मारण्यासाठी दुकानात सोनी कंपनीचे एअर कॉम्प्रेशन मशिन घेतले होते.
दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. चे सुमारास विजय लोखंडे हे नेहमी प्रमाणे त्यांचे साई श्रध्दा वॉशिंग सेंटर आवरुन दुकानाला कुलुप लावुन घरी गेले त्यानंतर दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. चे सुमारास ते त्यांचे वाँशिंग सेंटर उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांच्या दुकानाचा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले व दरवाजा अर्धवट उघडा दिसला.तेव्हा त्यांनी दुकानात जावुन पाहिले असता दुकानातील पाच हजार रूपये किंमतीचे सोनी कंपनीचे एअर कॉम्प्रेशन मशिन चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता मशिन मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे मशीन चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
विजय शंकर लोखंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १३३८/२०२२ भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.