देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी पोलिस पथकाने तालूक्यातील गुहा येथे दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी एका घरात छापा टाकून सुमारे ३ हजार ६०० रूपयांचा गुटखा जप्त करून एका जणाला ताब्यात घेऊन गजाआड केले.
दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान राहुरी पोलिसांचे एक पथक नगर मनमाड राज्य महामार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील गुहा येथील आरोपी मोईन सय्यद याच्या घरात छापा टाकला.
पोलिस पथकाला मोईन सय्यद याच्या घरात हिरा व विमल गुटख्याचा साठा दिसून आला. हिराचे २५ पूडे व विमलचे ६ पूडे असा एकूण ३ हजार ५८८ रूपयांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त करून पोलिस पथकाने मोईन सय्यद याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलिस नाईक प्रविण अहिरे, आजिनाथ पाखरे, नदिम शेख आदि पोलिस कर्मचारी सामील होते. पोलिस कर्मचारी सचिन विठ्ठल ताजणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोईन मन्सुर सय्यद, वय २९ वर्षे, रा. गुहा, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ५८/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन. डी. गर्जे हे करीत आहेत.