देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडी दांडा मारून रवींद्र म्हसे या तरूणाला गंभीर जखमी करण्यात आले. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दिनांक 19 जानेवारी घडलेल्या घटने पासून रवींद्र म्हसे या तरूणावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील महादेव मंदिराजवळ सप्ताहचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा रात्री नऊ वाजे दरम्यान जेवणाच्या पंगती चालू असताना रवींद्र प्रभाकर म्हसे हा जेवण करीत असताना त्यावेळी आरोपी सौरभ तागड याने रवींद्र प्रभाकर म्हसे याच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले. त्याच्या तब्बेतीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे नातेवाईकांकडून समजले. सुमन प्रभाकर म्हसे, वय 45 वर्षे, रा. शिलेगाव, ता. राहुरी. यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ भाउसाहेब तागड, राहणार शिलेगाव, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 307 प्रमाणे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.