संगमनेर : शहरातील नियमबाह्य व अनधिकृत हॉस्पिटलवर कारवाई करावी, या मागणीसाठी पालिका प्रशासना विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेने पुन्हा सुरू केलेले आमरण उपोषण पालिका व ग्रामीण रुग्णालयाच्या लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी उशिरा मागे घेतल्याची माहिती संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिली.
छावा संघटनेच्या आमरण उपोषणाची दखल घेत पालिका व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली. उपोषणाला बसलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले. अनधिकृत व नियमबाह्य हॉस्पिटलची तपासणी करू, असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी लेखी पत्रकात म्हटले आहे. तर शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये दर पत्रक व रुग्ण संहिता चार्ट लावण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, पालिकेचे प्रशासक अधिकारी सुनिल गोर्डे, कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र गुंजाळ छावा संघटनेचे जालिंदर राऊत, दिनकर घुले, सचिन बालोडे, बाळासाहेब कानवडे, किरण गुंजाळ, रुपेश राऊत, पोपट भारसकाळ, निलेश गुंजाळ, विलास रसाळ व शहरातील डॉक्टर यावेळी उपस्थित होते.