अहिल्या नगर प्रतिनिधी : 1 नोव्हेंबर 2021 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर चौकशी लावण्याबाबत डीएसपी चौक येथे मोठे जन आंदोलन उभारून रस्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, अहिल्यानगर उत्तर विशाल कोळगे व त्यांचे सहकारी संजय सुखदान, जीवन पारधे, संतोष जठार, प्रतीक बारसे,अमर निरभवणे, आकाश जाधव, अजय पाखरे, संजय जगताप यांच्यावर जमाबंदी तसेच कलम 188,341,269 याप्रमाणे गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे दाखल करण्यात आला होता.
सदर खटला हा न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड.राहुल पवार यांनी काम पाहिले सदर खटला हा न्यायालय मध्ये 2021 पासून ते 2025 पर्यंत न्यायप्रविष्ठ होता परंतु दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे व त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्तता केली आहे.