वाचनालय संगणीकरण एक अनुभव                

0

वाचनालयाच्या ग्रंथपाल पदाचा पदभार स्वीकारताना वाचनालयातील ग्रंथ व नियतकालिकांची अवस्था खूप अस्ताव्यस्त होती वाचनालयामध्ये आज तागायात 27000 ग्रंथ आहेत ग्रंथांची मांडणी अयोग्य असल्यामुळे सभासदांना आवश्यक असलेले ग्रंथ शोधणे अशक्य होते. त्यामुळे सभासदांना अपेक्षित ग्रंथ न देता इतर कुठलीही ग्रंथ देऊन अल्पसंतुष्टी करावे लागत होते. परंतु त्यामुळे सभासद नाराज होण्याच्या घटना वाढायला लागल्या होत्या, वाचकांची संख्या कमी होत गेली, गावातील प्रतिष्ठित नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रंथ मागितल्यानंतर अपेक्षित ग्रंथ शोधून देताना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, गावातील व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, वाचनालयास भेट देतात त्यावेळी वाचनालयाची दुरावस्था पाहून नाराज होत होते. परंतु याविषयी माजी नगराध्यक्ष श्री सत्यजित कदम यांच्याशी चर्चा केल्यानंतर व माननीय मुख्याधिकारी श्री अजित निकत यांच्या मार्गदर्शनाने वाचनालय संगणकृत करून अद्यावत करण्याचे ठरले. त्यावरून मा. सर्वसाधारण सभेसमोर विषय मांडून चर्चा करण्यात आली व त्यातून वाचनालय संगणीकरण करून अद्यावत करण्यास मंजुरी मिळाली. त्यावरून अनुभवी ठेकेदाराकडून निविदा मागविण्यात आल्या त्याप्रमाणे टेक्नोटाईम कॉम्प्युटर सिस्टीम अहमदनगर यांचे कडून काम करण्याचे ठरले. ठरले प्रमाणे दोन महिन्यात काम पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला. *आज्ञावली कशी असावी*       सार्वजनिक वाचनालयासाठी योग्य संगणक प्रणाली निवडणे एक महत्त्वाचे काम होते. वाचनालयाचे कामकाज मराठी भाषेत असल्यामुळे मराठी परिपूर्ण व खास सार्वजनिक वाचनालयाची गरज लक्षात ठेवून बनविलेली आज्ञावली आवश्यक होती. आज्ञावली मध्ये वाचनालयास आवश्यक ग्रंथ, नोंदणी, देव- घेव ग्रंथ शोध, ग्रंथ परिगणन, नियतकालिके हजेरी, अकाउंट, सभासद नोंद व वर्गणी मालमत्ता नोंद, वार्षिक अहवाल, इत्यादी सर्व सुविधा व 26 प्रकारचे अभिलेख असणे आवश्यक आहे.               

 *ग्रंथ मांडणी कशी करावी*

ग्रंथालय शास्त्रा  प्रमाणे ग्रंथ वर्गीकरण अधिक किचकट असल्याने, तसेच दरवर्षी ग्रंथ संख्या वाढत असल्याने, वाचनालयात भविष्यात जागेची अडचण वाढण्याची शक्यता असल्यामुळे व विषयवार मांडणी करण्यासाठी अधिक जागेची गरज भासल्यामुळे ग्रंथ मांडणी विषयाप्रमाणे न करण्याचे ठरले तसेच सभासदांना विषयाप्रमाणे ग्रंथ आवश्यक असल्यास संगणकावरती विषयाप्रमाणे ग्रंथ शोधणे शक्य असल्यामुळे व सभासदांना स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केल्यामुळे ग्रंथ मांडणी विषयानुसार करण्याची आवश्यकता राहिली नाही संगणकावरती ग्रंथ नोंद करताना ग्रंथाला ठराविक जागा निश्चित करून संगणकावरती स्थान निश्चिती नोंदविल्यामुळे वाचकांना शोधलेले ग्रंथ कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे ते निश्चित लक्षात येते. त्यामुळे ग्रंथ मांडणी दाखल अंकाप्रमाणे करण्यात आली.   

   *बारकोडींग कसे करावे*                       

बारकोडी करताना बारकोडींग साहित्य योग्य पद्धतीने निवडणे आवश्यक आहे बारकोड लेबल सफेद रंगाचे नॉन टेरिबल रेझिंग पेपर निवडावे बारकोड प्रिंटर टी एस सी प्रो 244 खरेदी करावा बारकोड प्रिंट करताना त्यावरती वाचनालयाचे नाव नोंदवावे. दाखल अंकाप्रमाणे बारकोड तयार करावा. बारकोड सीओडीई 39 किंवा सीओडीई 188 प्रकारचा निवडावा.

*सभासदांना ग्रंथ शोधण्यासाठी मोबाईल ॲप*

वाचनालयातील 27000 ग्रंथा पैकी वाचकांना आवश्यक ग्रंथ घरबसल्या शोधता यावा यासाठी सर्व ग्रंथांचे वर्गीकरण करून संगणकावरती सर्व ग्रंथांची माहिती नोंद केली. त्यावरून एक मोबाईल ॲप तयार करून विषय वार ग्रंथ माहिती, लेखकाप्रमाणे ग्रंथ माहिती,ॲप मध्ये नोंद केली             

*दैनंदिन कामकाज कसे करावे*                   

 वाचनालय संगणकृत झाल्यानंतर वाचनालयाचे दैनंदिन कामकाज कसे करायचे हा एक महत्त्वाचा विषय आहे सकाळी वाचनालय उघडल्यानंतर सर्व नियतकालिकांवरती वाचनालयाचा शिक्का मारून सही करणे. आज्ञावली मध्ये नियतकालिकांची हजेरी घेणे. ग्रंथ देव घेऊन करताना वाचकांना अपेक्षित ग्रंथ शोधल्यानंतर आज्ञावली मध्ये सभासदाचे खाते उघडणे. सभासदांची सर्व माहिती दर्शविली जाते (उदा. येणे बाकी ग्रंथ, येणे बाकी नियतकालिके, जमा झालेली व शिल्लक फी इ.)  यामध्ये ग्रंथ देव – घेव नोंद करणे दिवसाचे काम झाल्यानंतर शेवटी ग्रंथ देव – घेव यादी छापने त्यावरून देव घेव केलेल्या नोंदी तपासणे. “पंचसूत्रेप्रमाणे वाचनालयाची  वाटचाल नसेल तर असे वाचनालय निरुपयोगी आहे”        

  लेखक                             

  श्री संभाजी मोहन वाळके 

   सहाय्यक ग्रंथपाल               

श्री त्रिंबकराज मोफत वाचनालय, देवळाली प्रवरा नगरपरिषद ,देवळाली प्रवरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here