वाहनाच्या धडकेत दोन वर्षाचा नर बिबट्या गंभीर जखमी ; औषधोपचारासाठी नाशिकला हलवले 

0

संगमनेर : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर चिंचपूर- औरंगपूर शिवारातील अस्मिता डेअरी नजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या गंभीररित्या जखमी झाला. सदरची घटना काल सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमी बिबट्यावर संगमनेरचे पशुसंवर्धन अधिकारी बाहेरगावी असल्याने उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याला नाशिकला औषधोपचारासाठी घेऊन जावे लागले.

         काल सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदरचा बिबट्या हा डेंगळे यांच्या शेताकडून अस्मिता डेअरीच्या रस्त्याकडे जात असावा.त्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने या दोन वर्षे व यांच्या नर बिबट्याला जोराची धडक दिली. जोराच्या धडकेने हा बिबट्या उडून जवळच्या झुडपात जाऊन पडला व गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो दुखापतीने विव्हळत होता. त्याचा गुरगुरण्याचा आवाज एैकून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अपघाताचा हा प्रकार लक्षात आला. काही नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व आश्वी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनकर्मचारी अशोक गीते, रवींद्र पडवळ, सोनवणे, जारवाल, मुंडे यांच्यासह आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शांताराम झोडगे, संतोष शिंदे हे तातडीने तेथे दाखल झाले. त्यांनी बिबट्याला अलगद पिंजऱ्यात टाकले आणि औषधोपचारासाठी संगमनेरला आणले मात्र संगमनेरातील पशुसंवर्धन अधिकारी मीटिंगच्या निमित्ताने बाहेरगावी असल्याने संगमनेरात या बिबट्यावर उपचार होऊ शकले नाहीत त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला नाशिक येथे नेले तेथे बिबट्याच्या शरीराचे एक्स-रे काढून व आवश्यक औषधोपचार केल्यानंतर त्याला पुन्हा काल उशिरा माघारी संगमनेरकडे आणले जात होते. त्याला आता संगमनेर खुर्द येथील नर्सरी मध्ये ठेवून पुढील औषधोपचार करण्यात येणार आहेत त्याच्या पाठीमागील पायासह कमरे खालील भागाला मोठी दुखापत झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here