विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे – डॉ.प्रकाश रसाळ

0

ऊलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

नगर – सध्या मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषत: डोळ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुस्तके वाचतांना, मोबाईल, कॉम्प्युटर पाहतांना अधून-मधुन ब्रेक घेतला पाहिजे. तसेच डोळ्यावर पाणी मारावे. जर त्रास जाणवत असल्यास तपासणी करुन घ्यावी. विद्यार्थ्यांनी आरोग्याबाबत जागृक राहिले पाहिजे. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असे म्हणतात त्यामुळेच डोळे हा सर्वात  महत्वाचा भाग आहे, त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.  फार्मसी कॉलेजच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, असे प्रतिपादन रसाळ नेत्रालयाचे डॉ.प्रकाश रसाळ यांनी केले.

वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज. पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नुकताच नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी  रसाळ नेत्रालयाचे प्रमुख डॉ.प्रकाश रसाळ, अमृता रसाळ, डॉ.मंजुषा व्यास, हर्ष शेळके, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण आदि उपस्थित होते.

     यावेळी डॉ. प्रकाश रसाळ यांनी विद्यार्थ्यांना डोळ्याचे महत्व समजावून सांगत, डोळ्याची काळजी कशी घ्यावी, डोळ्यांना मोबाईल कसा घातक आहे. नंबरचा चष्मा लागू नये यासाठी घ्यावयाची काळजी लागलेला नंबरचा चष्मा घालविण्यासाठी काय केले पाहिजे, कायमचा चष्मा नको असेल तर काय केले पाहिजे. लेजर ट्रीटमेंट तसेच आधुनिक मशिनरीची माहित दिली. तसेच रसाळ नेत्रालयात विद्यार्थ्यांची वर्षभर मोफत तपासणी करण्यात येईल, असे सांगितले.

     यावेळी डॉ.निलेश जाधव म्हणाले, फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सर्वांगिण माहिती व्हावी, तसेच त्याच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. आज नेत्र तपासणी बरोबरच डोळ्यांचे विकार आणि त्याची काळजी कशी घ्यावी, या विषयी मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच या क्षेत्रातील संशोधन आणि बदलांविषयी ज्ञानातही भर पडली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी करुन सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here