विवाहित तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढली, पोक्सो अंतर्गत गुन्हा 

0

देवळाली प्रवरातील प्रकार, मजणूची धुलाई 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                  माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनीची विवाहित तरुणाने छेड काढून मला तु लई आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे.असे म्हणून हात धरुन गाडीवर बस असे म्हणत असताना मुलीच्या नातेवाईकांनी येथेच्छा धुलाई करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.छेडछाडीची घटना माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्या मजणूस नागरीक व शालेय विद्यार्थ्या समोर बेदम चोपला.या मजणूने या पुर्वी दोन विवाह झाले आहेत.राहुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

                   देवळाली प्रवरा येथिल शाळेत लगतच्या गावातून मुले वमुली शिक्षणासाठी येत असतात.हि अल्पवयीन मुलगी सायकलवर रोज शाळेत येत असते.हा विवाहित मजणू रोज शाळा भरण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी दुचाकीवरुन पाठलाग करतो.हा नित्याचा प्रकार झाल्याने मुलीने शाळेत येणे बंद केले.पालकांनी तु शाळेत का जात नाही असे विचारले असता मी ज्या रस्त्याने जाते येते त्या रस्त्याच्याकडेला राहणारा एक मुलगा माझा पाठलाग करुन माझी छेड काढतो असे तिने सांगताच पालकांनी तु उद्या शाळेत जाताना तो मुलगा आम्हाला दाखव असे सांगुन त्या मुलीस शाळेत पाठवले मुलगी पुढे सायकलवर जात असताना पालक थोड्या अंतरावरुन मोटारसायकलवर पाठीमागे चालत असताना हा मजणू मुजामीन उर्फ मुन्ना मुसा पठाण (वय 32 रा.देवळाली प्रवरा) याने मोटारसायकलवरुन येवून सायकला दुचाकी आडवी घालून तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे.तु आताच चल माझ्या गाडीवर बस तीचा हात धरुन तीला ओढू लागला माञ अल्पवयीन मुलीने नकार देताच तुझ्यावर ब्लेडने वार करीन अशी धमकी देत असताना पालकांनी पाठीमागून त्यास धरले त्याच ठिकाणी त्याची येथेच्छा धुलाई केली.त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी घेवून चालले असता पोलिस चौकी बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास राहुरी पोलिस ठाण्यात चालवले असताना माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना घटनेची माहिती समजताच ते सोसायटी चौकात दाखल झाले. नगराध्यक्ष कदम यांनी या विवाहित मजणूची धुलाई केली.या घटनेची माहिती मजणूच्या वडीलांना कळताच वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील सर्वासमक्ष धुलाई केली.या विवाहित मजणूचे दोन विवाह झालेले असताना एकही बायको त्याच्या जवळ नांदत नाही.

               राहुरी  पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होत. जमावाच्या ताब्यातून सुटका करुन राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरुन मुजामीन उर्फ मुन्ना मुसा पठाण याच्या विरोधात विनयभंग पोक्सो अंतर्गत व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राहुरीचे पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here