पोहेगांव बुद्रुक नं २ विकास सोसायटीची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव (प्रतिनिधी ) : स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी १९६९ साली पोहेगांव बुद्रुक नं २ विकास सोसायटीची स्थापना करून शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आधार दिला. पन्नास वर्ष संस्थेचे कामकाज पाहत असताना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे संस्था सांभाळली, ती टिकवली व वाढवली. त्यांचा सहकारी क्षेत्रावर गाढा अभ्यास होता. त्यांच्या शिकवणीवरच आज संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सोसायट्यानी बँकेवर अवलंबून न राहता विविध व्यवसा्याच्या माध्यमातून आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत्र वाढवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
ते काल पोहेगाव बुद्रुक नंबर २ विकास सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते. संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्व. चांगदेवराव औताडे यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सभासदांनी संस्थेस सहकार भूषण श्री चांगदेवराव गणपतराव पाटील औताडे विकास सोसायटी असे नाव देण्याचा ठराव संमत केल्याबद्दल नितीनराव औताडे यांनी सभासदांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके,संचालक सुनिल बोठे,अनिल औताडे,दिलीप औताडे,संजय औताडे,कैलास औताडे,अनिल औताडे,सुनिल हाडके, सौ.सिमाताई औताडे,सौ.यमुनाबाई लांडगे, सोमनाथ सोनवणे,मधुकर भालेराव, तसेच सभासद उपसरपंच अमोल औताडे राजेंद्र औताडे,सुनिल औताडे,अशोक औताडे,चांगदेव पाचोरे,नितीन आभाळे,गणेश गोसावी, आण्णासाहेब औताडे ,रंगनाथ देशमुख, गोरक्षनाथ जोंधळे, भीमा औताडे,सुखदेव भोजने , सचिव संदीप फटांगरे आदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रात ९वा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या अभिषेक जोंधळे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी सांगितले की संस्थेने चालू आर्थिक वर्षात १ कोटी ५६ लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. संस्थेच्या सभासद संखेत वाढ झाली असून नव्यानेच ४९ सभासद नोंदणी झाली आहे असे सांगितले.तर संस्थेचे संचालक दिलीप औताडे यांनी संस्थेने चालू आर्थिक वर्षात १० लाख ४२८ रुपये नफा मिळवला असून सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप केले जाणार असल्याचे जाहीर केले. संस्थेचे सचिव संदीप फटांगरे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.