देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी गेल्या 19 दिवसा पासुन आंदोलन सुरु केले आहे. सातत्याने पाठ पुरावा करुनही संस्थेचे व्यवस्थापकीय मंडव व प्रशासकीय मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांवर अन्याय केला जात आहे.आंदोलना दरम्यान तीन ते चार वेळा प्रशासकीय अधिकारी यांच्याशी झालेली चर्चा निषफळ ठरल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सोमवार दि.11 सष्टेबर रोजी पाच कामगार आत्मदहन करणार असल्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
याबाबत कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय, राहुरी फॅक्टरी येथील शिक्षकेतर कर्मचारी असून आम्ही दि. ७ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमच्या मागणी संदर्भात वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन दिलेले होते. पण अधिकाऱ्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर कसलीही कार्यवाही केली शासनाची नाही. गेल्या 23 वर्षात प्रशासनाने एकदाही पगार वाढ केली नाही.
यावेळी कामगारांनी काम बंद आंदोलन गेल्या 19 दिवसा पासुन सुरु असुन सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य आश्वासित प्रगती योजना, कोवीड काळातील थकित पगार, कोवीड सेंटरमध्ये कामगारांचे मानधन, कंत्राटी कामगारांना कायम करणे, पगार वाढ आदी मागण्यांसाठी संस्था आवारात काम बंद आंदोलना बरोबार विविध आंदोलने सुरु करण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रशासकीय मंडळातील प्रशासकीय अधिकारी यांच्याशी तीन ते चार वेळा चर्चा करण्यात आली.परंतु हि चर्चा निष्फळ ठरली आहे.आंदोलन कामगारांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनातील राजेंद्र साळुंखे, सोपान वाणी, संतोष दुशिंग, अशोक ठुबे, अश्फाक शेख या पाच कामगारांनी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास दि.11 सष्टेबर रोजी प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी पञाद्वारे प्रशासनाला कळविले आहे.
या आंदोलनात सिद्धु सूर्यवंशी, गोविंद पठारे ,भगवान म्हसे , गजानन वराळे, कैलास कदम, प्रमोद साळुंखे, अमृत कदम, किशोर कोळसे, जेम्स पाळंदे, संतोष दुशिंग, तोडमल सिस्टर, सोनू म्हस्के, गोरख वाळुंज जुंदरे अशपाक सय्यद ,राजेंद्र लांबे, अशोक उगले, दत्तू मोरे, दत्तू चव्हाण, दत्तू हिवाळे, राजेंद्र म्हसे विजय डुकरे, नंदू कदम ,अल्ताफ इनामदार, राजेंद्र साळुंखे, अशोक देवकाते, विठ्ठल देवरे, बाबासाहेब तांबे, विलास काळे,अरुण तौर, दत्तू हिवाळे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.