शिवांश चांदगुडे, विराज जामदार यांची कौतुकास्पद कामगिरी
सुरेगाव प्रतिनिधी : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते. आपले भविष्य विज्ञानावरच आधारित असून त्यासाठी शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान मिळवण्याची संधी मिळत असून त्याचबरोबर त्यांना विज्ञानाच्या मुलभूत तत्त्वांची गोडी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ म्हणून घडवण्याच्या दृष्टीने विज्ञान प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे माध्यम असल्याचे मत पंडितराव चांदगुडे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील पंचायत समिती व अध्यापक संघ यांनी विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ. आशुतोष काळे , गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे गटशिक्षणाधीकारी शबाना शेख ,गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडितराव चांदगुडे यावेळी उपस्थित होते यावेळी फार्मर्स डेन पब्लिक स्कुलचे दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता व त्यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय बक्षीस घेवून यश पटकावले कु.शिवांश निलेश चांदगुडे व कु.विराज विकास जामदार यांनी यश झळकावले.
यावेळी चांदगुडे बोलताना म्हणाले विज्ञान प्रदर्शनाच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासातून बाहेर पडून वास्तविक जीवनात असलेल्या समस्यांवर काम करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत मिळते. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ शाळेतील शास्त्रज्ञ म्हणूनच नव्हे तर भविष्यात जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी आवर्जून विज्ञान-गणित प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विजय काळुंगे, विशाखा बडवर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. फार्मर्स डेन पब्लिक स्कुलच्या संचालिका माधुरी युवराज चांदगुडे गोदावरी प्रतिष्ठानचे सचिव रविराज चांदगुडे, उपाध्यक्ष युवराज चांदगुडे, मुख्याध्यापिका अर्चना बोरावके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.