उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरतसिंह रावत व ना.विनोद गोटिया यांचे व्यापारी आघाडीच्यावतीने सत्कार
नगर – पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने सर्व घटकांसाठी विविध योजन कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेत अनेकांनी आपली उन्नत्ती साधली आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. व्यापारी वर्गासाठी विविध योजनांसुरु करण्यात आल्या असून, यामुळे व्यापार्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. आतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापारी धोरणाचा अवलंब करुन उद्योग, व्यापाराला चालना देण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षांची कारकर्दी ही ‘सब का साथ सब विकास’ या धोरणावर सरकारचे काम सुरु आहे. नगरमधील व्यापार हा राज्य व देशभर चालतो, या व्यापार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय पातळी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार तिरतसिंह रावत यांनी दिले.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार तिरतसिंह रावत व मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे अध्यक्ष ना.विनोद गोटिया हे नगरमध्ये आले असता त्यांचे अहमदनगर व्यापारी आघाडीच्यावतीने अध्यक्ष विलास गांधी, अनिल गट्टाणी यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केले. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, राजेंद्र चोपडा, वसंत राठोड, गोपाल मनियार, सोनीमंडलेचा, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, अजित गुगळे, नवनीत चंगेडे आदिंसह व्यापारी, आडते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विलास गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सर्व घटकांचा विकास साधत आहे. केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या 9 वर्षांत देशात अंतर्गत मोठी प्रगती साधली आहे. यात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान राहिले आहे. उद्योग व व्यापाराला चालना देण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहेत. परंतु आजूनही व्यापार्यांच्या काही मागण्या, प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविण्यााठी मा.तिरथसिंग रावत यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करुन भाजपा सरकारच्या मागे व्यापारी खंबीरपणे उभे राहतील, असे सांगितले. याप्रसंगी अनिल गट्टाणी यांनी व्यापार्यांच्या प्रश्न, अडचणीबाबत रावत यांच्याशी चर्चा केली. शेवटी भैय्या गंधे यांनी आभार मानले.