कोपरगाव(वार्ताहर) हल्लीचे जग धावपळीचे असल्याने प्रत्येक माणसाला आपले काम वेळेत होणे महत्त्वाचे असते त्यामुळे धावपळ जास्त होते. ऑफिस व इतर क्षेत्रात बैठक जास्त असल्याने माणसाचे वजन वाढते त्यामुळे त्यांना ब्लड प्रेशर थकवा साखर अदी आजाराने ग्रासले जाते. यापासून सुटका होण्यासाठी प्रत्येकाने व्यायामात सातत्य ठेवले तर वजन कमी जास्त होत नाही व इतर आजारांनाही आपण बळी पडत नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे भैरवनाथ वेलनेस फिटनेस क्लब चांदेकासारे यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते.
यावेळी भैरवनाथ वेलनेस फिटनेस क्लबचे व्यवस्थापक संजय कानडे, सरपंच किरण होन, माजी सरपंच केशवराव होन, पोलीस पाटील मीराताई रोकडे, सुनील खरात, मिलिंद झगडे, सुभाष होन, कर्ना होन, युनुस शेख, मलू होन, रावसाहेब होन, विश्वनाथ होन अदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय कानडे यांनी सांगितले की बाल भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील आलेल्या हजारो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून शारीरिक स्वास्थ कसे चांगले राहील याची माहिती देण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या क्लबच्या अंतर्गत परिसरातील हजारो नागरिकांना दररोज मोफत व्यायाम मार्गदर्शन, पहाटे ऑनलाईन व्यायामाचे वर्ग अदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा चांदेकसारे पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी फायदा घेतला.