नगर – आपल्यातील प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी प्राणायम, योगासन अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येकाने दरोज योग ही दिनचर्या करावी. धावपळीच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वाढविणे, छोट-मोठे आजार, स्मरणशक्ती यासाठी योग महत्वाचा आहे. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा दुवा म्हणजे योग होय, यासाठी लहानांपासून थोरांनी नियमित योग-प्राणायम केले पाहिजे. शालेय जीवनापासून याची सवय-गोडी विद्यार्थ्यांच्या अंगी लागावी, यासाठी महाविद्यालयात नियमित योग-प्राणायम केले जात असल्याचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी सांगितले.
जागतिक योग दिनानिमित्त केडगांव येथील भाग्योदय माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड, योग शिक्षक गोविंद कदम, बाबासाहेब कोतकर, सोपान तोडमल, एकनाथ होले आदि उपस्थित होते.
प्रारंभी दिपप्रज्वलन करुन योगा विषयी माहिती दिली. यावेळी योगशिक्षक गोविंद कदम यांनी प्रात्याक्षिके करुन दाखविली. विद्यार्थ्यांनी उत्साहात विविध योग प्रकारांचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव कार्ले, धनंजय बारगळ, गोरक्ष कांडेकर, संतोष काकडे, आदिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, रेणुका गुंड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड, गणेश गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले. आभार एकनाथ होले यांनी मानले.