कोपरगाव : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते.संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. अमोल अजमेरे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ . अमोल अजमेरे पुढे म्हणाले की विज्ञान प्रदर्शनातुन विदयार्थीची संशोधन वृत्ती वाढते, तसेच व्यावहारीक जीवनात ही वैज्ञानिक तत्वे विदयार्थीनी अंगीकारल्यास त्याचा फायदा होईल. विदयालयातील विद्यार्थीनी इ.५ वी ते इ.१० वी विविध गटातुन गणित व विज्ञान वरील ७८ उपकरणे तयार केली होती. त्याच प्रमाणे विज्ञाना विषयावर आधारीत रांगोळी व पोस्टर स्पर्धेत जवळजवळ ८० विदयार्थीनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी विद्यार्थ्यांनी सदय स्थितीवर उपकरण निर्मिती केल्या बददल विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव दीलीपकुमार अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,प्राथमिक विभागाच्या मूख्याध्यापिका सौ.मिना पाटणी यांनी भेट देवुन विद्यार्थीचे कौतुक केले. विदयालयातील विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी, निलेश होन,दीगंबर देसाई,राहुल चौधरी,पंकज जगताप, विजय कार्ले ,सुरेंद्र शिरसाळे,सौ.श्वेता मालपुरे, सौ. गौरी जाधव,सौ.संजीवनी डरांगे,रुपाली साळुंके यांनी विशेष परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय देसाई केले.विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगाचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षक विजय कार्ले व सुरेंद्र शिरसाळे,कुलदीप गोसावी यांनी केले. या प्रदर्शनामध्ये भित्तीपत्रके व रांगोळीच्या माध्यमातुन वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा म्हणून वैज्ञानिक संकल्पनेवर त्यांचे आयोजन करण्यात आले हे या प्रदर्शनाचे वैशिष्टये होते. या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थीचा भरपुर प्रतिसाद मिळाला. रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे संयोजन सौ. शीतल अजमेरे,सौ.अनाली सोनवणे,सौ.कवीता गवांदे यांनी केले. शाळेतील विदयार्थी व पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.