कोपरगाव (वार्ताहर) अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा हा खरा दोषी असून शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा शिका संघटित व्हा संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण घेतल्यानंतर कोणत्याही समाजातील माणूस अन्याय सहन करणार नाही असे प्रतिपादन कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ गोरक्षनाथ रोकडे यांनी केले.
ते काल चांदेकसारे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना बोलत होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना हा जयंतीचा कार्यक्रम एक महिनाभर चालतो. मात्र त्यांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करून समाजाला ते मार्गदर्शक कसे ठरतील अशी साजरी करा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 133 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
यावेळी सरपंच किरण होन ,उपसरपंच सचिन होन, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, माजी संचालक आनंदराव चव्हाण, कोल्हे कारखान्याचे संचालक ॲड ज्ञानेश्वर होन, माजी सरपंच केशवराव होन, गोदावरी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष होन, जिल्हा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष जयद्रथ होन,पोलीस पाटील मीराताई रोकडे ,डॉ. गोरक्षनाथ रोकडे, भास्कर होन, राहुल होन, सय्यदनूर शेख, बाळासाहेब खंडीझोड, डॉ खंडीझोड, सुधाकर होन, सागर होन, सुनील होन ,श्री खरात,रवींद्र खरात, विजय खरात, वशिम शेख, मनोज होन ,धीरज बोरावके, अर्जुन होन,मनराज होन, ग्रामसेवक श्री राठोड अदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉक्टर खंडीझोड यांनी सांगितले की भारतातील शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आज सर्वांचे तारणहार ठरत आहे. स्त्री शक्ती शेतकरी तसेच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे डॉ. खंडीझोड यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खंडीझोड यांच्या वतीने उपस्थित असलेल्या नागरिकांना अल्पोहार देण्यात आला. सुधाकर होन यांनी सर्वांचे आभार मानले.