संगमनेर : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काल गुरुवारी शहरातील शिवसेना शाखा क्रमांक ११ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व बंधाला काल गुरुवारी शहरातील शाखा क्रमांक ११ च्या वतीने राजस्थान थिएटरमध्ये गरजू दीडशे ते दोनशे शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच पाच वह्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप साळगट,माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे,बाळासाहेब डावखरे, भैया तांबोळी,अमित पवार, दत्ता कोळपकर,समीर ओझा, गोटुशेठ अट्टल, अनिल अट्टल, शाम पन्हाळे, शशी घोलप, पप्पू कानकाटे,किर्षणा केसेकर, संजय वलवानी, जशन वलवानी, वाल्मीक वाकचौरे,पप्पू शिंदे, इसाक रंगरेज, सकिर बेग, पप्पू धुळगंड, महादेव शिंदे, सचिन बांगर आदीसह शहरातील व्यापारी,विद्यार्थी, महिला उपस्थित होते.