कोळपेवाडी वार्ताहर :- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक गुरुवार (दि.०६) रोजी सकाळी ६.०० वा.आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील हिंदवी राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला म्हणून रायगडावर त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असून त्यांचे कार्य, कर्तृत्व आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. महान राजा,अवघ्या मराठी मनाची अस्मिता, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अभिषेक सोहळा दरवर्षी रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
त्याप्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी महाराजांचा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.