संगमनेर : बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असून त्या दृष्टीने वरिष्ठांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहे. ग्रामीण भागात शिवसैनिकांडून सातत्याने मागणी होत असल्याने शिवसेना ठाकरेगट बाजार समितीच्या निवडणुका लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय फड यांनी दिली.
सध्या राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. संगमनेर बाजार समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शिवसैनिक या संदर्भात सतत मागणी करत असल्याने त्यांच्या मागणीचा योग्य तो विचार करत शिवसैनिकांना या निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. वरिष्ठांना याची माहिती दिली जाणार असून लवकरच पुढील दिशा ठरवून अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेना शेतकरी,शेतमजूर सर्व सामान्य नागरिकांच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली आहे. त्यांचे हक्क आणि मागण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद निवडणुकांही या पुढील काळात होणार असून शिवसेना आपली ताकद दाखवून देणार आहे असे सांगून संजय फड म्हणाले की , तालुक्यात शिवसेनेचे कार्य खूप खोलवर रूजले आहे. याचा फायदा शिवसेनेला होणार असून बाजार समितीच्या निवडणुकीत उमेंदवाराची चाचपणी काली जात आहे. शिवसेना आता गावागावात संपर्क अभियान राबवत आहे. पदाधिकारी,कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहचत असून शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचविले जात आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना सर्वच जागा लढविणार असून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. या सर्वाची यादी तयार करून निष्ठवान शिवसैनिकांना संधी दिली जाणार आहे. विविध गटात योग्य उमेदवाराला संधी दिली जाणार असून ज्यांना शिवसेने कडुन उमेदवारी पाहीजे अशा इच्छुक उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन फड यांनी केले आहे.