शुटींगबाँल स्पर्धेत मुलींच्या गटातुन अमरावती विभागाने मुलांमध्ये नाशिक विभागाने मैदान मारले 

0

राज्यस्तरीय निवड चाचणीत देवळाली प्रवराच्या प्रज्ञा व प्रगती गडाख यांची निवड  मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रा.गणेश भांड यांची निवड 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 देवळाली प्रवरा येथिल श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार परडलेल्या 42 वी ज्युनिअर गट (मुले व मुली)महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी शुटींगबाँल स्पर्धेत मुलींच्या गटातुन अमरावती विभागाने प्रथम तर मुलांमध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक मिळवून मैदान मारले.तर स्पर्धे दरम्यान चमकदार खेळ दाखविणाऱ्या दोन उत्कृष्ठ खेळाडू म्हणून आमरावतीचीची तन्वी खासबागे तर मुंबईचा मयुर प्रजापती यांची  निवड करण्यात आली. मुले व मुली अशा 30 खेळांडूची राज्यस्तरीय खेळासाठी निवड करण्यात आली.या निवडीत देवळाली प्रवरा येथिल प्रज्ञा गडाख व प्रगती गडाख यांची तर मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रा.गणेश भांड यांची निवड करण्यात आली आहे.

                  देवळाली प्रवरा येथे शुटींगबाँल फेडरेशन आँफ इंडिया,अँमँच्युअर शुटींगबाँल असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा हौशी शुटींगबाँल असोसिएशन यांच्या मान्यतेने  42 वी ज्युनिअर गट (मुले व मुली)महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी शुटींगबाँल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या 

                 या स्पर्धेत कोल्हापुर, नाशिक, अमरावती, मुंबई,लातूर,पुणे,संभाजीनगर (औरंगाबाद) आदी विभागातील मुले व मुली खेळाडू सहभागी झाले होते.मुलांचे 13 व मुलींचे 11 असे 24 सामने झाले.मुलां मधुन 7 तर मुलीं मधुन 6 सामने लीगसाठी झाले. यामधुन 2 सेमिफायनल 1 फायनल व एक थर्ड फायनल असे सामने रंगले  होते.मुलींमध्ये अमरावती संघाने प्रथय क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक सातारा,तृतीय क्रमांक नाशिक विभागाने पटकवला.मुलांमध्ये नाशिक विभाने प्रथम क्रमांक तर मुंबई विभागाने द्वितीय आमरावती विभागाने तृतीय क्रमांक पटकवला आहे.

             यावेळी राज्यस्तरीय खेळाडूंची निवड जाहिर करण्यात आली.मुलींमध्ये  तन्वी खाजबागे (अमरावती),स्नेहल हजारे (कोल्हापुर), ऋतुजा खाजबागे (अमरावती),नंदिनी बोराडे (कोल्हापुर), प्रज्ञा गडाख (नाशिक), ममता गुळवे (पुणे), गौरी म्हस्के (अमरावती),श्रावणी जाधव (कोल्हापुर),दिव्या इंजयीत (संभाजीनगर),कावेरी संसारे (नाशिक), पायल पेंडीवाल (लातुर),प्रगती गडाख (नाशिक),राखीव तीन खेळाडू मध्ये तेजस्वी कऱ्हे (कोल्हापूर),विदीका पुरंदरे (अमरावती),नौशिना चाँद (पुणे) आदी  खेळाडूंची निवड करण्यात आली.

               मुलांमधुन जिया अ.रहेमान (नाशिक),मयुर प्रजापती (मुंबई),फैजल मलिक (नाशिक),उदविक राजपुत (मुंबई),अब्दुला मोहम्मद असलम (नाशिक),ओम तुपकर (अमरावती),सौरभ नाईक (कोल्हापूर ),अनिकेत वानखडे (अमरावती),ऋतुराज वाघमारे (पुणे),सय्य अरबाज सय्यद निसार (संभाजीनगर),संचय कदम (कोल्हापुर),प्रथमेश थोरात (पुणे) राखीव तीन खेळाडू मध्ये हर्ष कुसमुडे (मुंबई )मनियार रिजवान (पुणे),महेश बिराजदार (लातुर) आदींची निवड करण्यात आली.

         निवड समितीत राजेंद्र पुजारी, राजेंद्र मोहिते,दादासाहेब तुपे,सदाशिव माने,ञ्यंबक राजे,चंद्रकांत तायडे आदींचा समावेश होता.

            प्राचार्य पोपट कडूस यांनी आपल्या भाषणातून खेळाडू व प्रशिक्षक यांनी निवड चाचणीत सहकार्य केल्याबद्दल व स्पर्धा भरविण्यासाठी भरीव मदत करणाऱ्या दात्यांचे आभार व्यक्त केले.

           विजेत्या संघाना बक्षिस वितरण प्रसंगी अँमँच्युअर शुटींगबाँल असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव विष्णू निकम, खजिनदार शकील काझी,छञपती पुरस्कार विजेते सदाशिव माने,राजेंद्र मोहिते,अतुल निकम,साहय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे,संदिप कदम,बाबासाहेब तुपे,रोशन पवार,गिरीष निमसे,स्वप्नील संसारे,चंद्रशेखर कान्हेरकर,प्राचार्य पोपट कडूस,माजी प्राचार्य बाबासाहेब चव्हाण,शाळा व्यवस्थापन व पालक शिक्षकसमितीचे सदस्य उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे सुञसंचालन संपत ढोकणे, ज्योती कोरडे तर आभार प्रदर्शन श्रीमती के.एम.शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here