देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
पायी वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाचे कळसाचे दर्शन घडले तरी विठ्ठलाचे दर्शन घडल्यासारखे वाटते याच दर्शनाने वारकरी तृप्त होतो. परमार्थामध्ये मोठी ताकात आहे.सतांनी जातीचा विचार केला नाही,ना जात सांगितली,ना कोणाला जात विचारली परमार्थात सेवक म्हणुन काम केले आहे.असे ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल श्री योगीराज ञिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता निमित्त ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. किर्तनसेवे दरम्यान दुष्टांत देताना परमार्थ सेवेत पायी वारकऱ्यांना कळसाचे दर्शन घडले तरी विठ्ठलाचे दर्शन घडल्यासारखे वाटते. एखादा भुकेलेला व्यक्ती जेवणा नंतर तृप्तीचा ढेकर देतो त्याच प्रमाणे वारकरी दरवर्षी दर्शनाने तृप्त होतात. पंढरीच्या वारीचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे.त्याचा अनुभव आनंद घ्यावा लागतो.
पांडुरंगाच्या पायावर विनोबा भावेंनी दर्शनासाठी डोके ठेवले आणि ओक्साबोक्सी रडू लागले. त्यामागचे कारण असे होते की, पांडुरंगाच्या पायावर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज अशा अनेक संतांनी डोके ठेवले होते. त्या संतांचे आज मला दर्शन झाले असे भावेंना वाटले होते.पांडुरंगाचे भक्तीभावाने दर्शन घेतात.देवळाली प्रवरा या गावातुन योगिराज ञिंबकराज, बाबुराव पाटील, संत महिपती महाराज दिंडीचे चालक देवळालीतील आहे.म्हणून हे गावच भक्तीच्या रसाने भरलेले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
चिंचपुर, चांदेगाव, करजगाव, देवळाली प्रवरा,मुसळवाडी, जातप आदी भागातील भजनी मंडळ सहभागी झाले होते.
यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज एकनाथ महाराज मोरे ह.भ.प. सिताराम ढुस, गिताताई धसाळ,दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बाबा महाराज मोरे, सुरेशशेठ वाबळे,रवींद्र महाराज पायमोडे,बाबानंद महाराज वीर, सोमनाथ महाराज माने, आबा महाराज कोळसे, हिराताई महाराज मोकाटे,रामदास देठे, रामचंद्र पा. जवरे, नामदेव महाराज शास्ञी जाधव, सुभाष महाराज विधाटे, संपत जाधव, आसाराम ढुस, संचालक अशोक खुरुद,बाबासाहेब सांबारे, अण्णासाहेब महांकाळ,गोकुळदास आढाव, राजेंद्र चव्हाण,महिपती महाराज देवास्थानचे सचिव बाबासाहेब महाराज वाळूंज, बाबासाहेब गायकवाड,सोपान भांड,आदींसह सोनगाव, आंबी, उक्कलगाव,मातापूर, लोणी येथिल भाविक उपस्थित होते.