श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडीचे बुधवारी प्रस्थान

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

               शेकडो वर्षांची वारीची परंपरा असलेल्या व महाराष्ट्राचे प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे चालू वर्षी श्री क्षेत्र ताहाराबाद ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारीसाठी वै. धनाजी बाबा गागरे मांडवेकर यांच्या पेरणेने व नाना महाराज गागरे, बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रस्थान होणार आहे.

             यावेळी महिपती महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणात वारकऱ्यांचे पहिले रिंगण होऊन हा सोहळा त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होणारआहे. वरशिंदे, कानडगांव, सात्रळ, लोणी, गोगलगाव, वडझरी, तळेगाव, नांदूर शिंगोटे,  मुसळगांव, शिंदेगाव, सातपूर मार्गे त्र्यंबकेश्वरकडे सोहळ्याचा प्रवास होईल. या सोहळ्यात नवनाथ महाराज आहेर, आबासाहेब महाराज कोळसे, शिवाजी महाराज शिरसाठ, सुनील महाराज पारे, सीमाताई आहेर व बालकीर्तनकार वैष्णवीताई नरोडे, विणेकरी बापूसाहेब गागरे, चोपदार कांता पाटील कदम, राजू (मुकुंद)चव्हाण, सुधीर काकडे, रावसाहेब पवार आदींसह वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

      या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त आसाराम ढूस व विश्वस्त समितीने केले आहे. 

चौकट

देवस्थानच्या  दिनदर्शिकेचे प्रकाशन.

        संत महिपती हस्तलिखित अभंग व महाराजांच्या आरती पुस्तिकेचे प्रकाशन. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम शिबिराचा समारोप व वृक्षारोपण आदीं कार्यक्रम बुधवारी आयोजित केलेले आहे

    _ बाळकृष्ण महाराज कांबळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here