श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

        देवळाली प्रवरा परिसरातील चारी नंबर चार, चोथे वस्ती, राहुरी फॅक्टरी पेपरमिल रोड, येथे गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी महिला भजनी मंडळ, जय मातादी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ यांच्या विशेष सहकार्याने व महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली तसेच बाबा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

           

सोहळ्यात दररोज सकाळी ८ ते ११ वाजता ग्रंथ वाचन, सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ वाजता प्रवचन, दररोज सकाळी ६, दुपारी १२, सायंकाळी ७ व रात्री १० वाजता बाबांची आरती होणार आहे. संजय महाराज शेटे, सुभाष महाराज विधाटे, उदय महाराज घोडके, आबा महाराज कोळसे, बाबासाहेब महाराज वाळुंज, संजय महाराज म्हसे,बाबा महाराज मोरे हे आपली प्रवचन व किर्तन सेवेतून निरुपण करणार आहेत.

         

  राहूल काळे, सचिन ढुस, बापूराव मुसमाडे, मारुती खरात, बापुराव जाधव, आदीनाथ तांबे, किशोर वरघुडे यांच्या हस्ते महाराजांचे पूजन होणार आहे.सकाळचा नाष्टा बाळासाहेब मोरे, ज्ञानेश्वर तांबे,आण्णासाहेब शेटे, सुखदेवराव मुसमाडे, कैलास जाधव,भगवान म्हसे, नामदेव उंडे, भाऊसाहेब गुंजाळ तर सायंकाळचे अन्नदाते बाबासाहेब चोथे, आबासाहेब वाळुंज,शिवाजी मोरे, केशव वरखडे, एकनाथ चोथे, सतिश खांदे, शाम कदम,गोपीनाथ हरगुडे, चंद्रकांत खांदे, कारभारी खुळे व भिमराज मुसमाडे हे आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका होईल. सकाळी ९ ते ११ वाजता उध्दव महाराज मंडलिक यांचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यात व्यासपीठ चालक साई भक्त श्रीनिवास सहदेव, काकडा, हरिपाठ नेतृत्व सुभाष महाराज विधाटे, केरु वामन, भास्कर तांबे, ताराबाई कदम, लंकाबाई पवार, त्रिंबक मोरे, किशोर निर्मळ, भाऊसाहेब माने, संदिप चव्हाण तर गायक ऋषीकेश शेटे, काशिनाथ टेकाळे, अशोक भुजाडी, कृष्णा मोरे, प्रसाद तरवडे हे आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था व बाल मित्र मंडळ, राहुरी फॅक्टरी यांचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here